• Download App
    संसदेत गदारोळ माजवून विजय चौकात "लोकशाही वाचवा"ची ओरड करणाऱ्या विरोधी खासदारांना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कानपिचक्या blame anybody but House must function. All seniors leaders of both sides must come together to run the parliament

    संसदेत गदारोळ माजवून विजय चौकात “लोकशाही वाचवा”ची ओरड करणाऱ्या विरोधी खासदारांना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कानपिचक्या

    सत्ताधारी खासदारांनाही शेलके शब्द सुनावले; हिवाळी अधिवेशन तरी नीट चालवा!!


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सर्व दिवस गदारोळ करून बंद पाडणाऱ्या विरोधकांना आणि सत्ताधारी पक्षालाही माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. blame anybody but House must function. All seniors leaders of both sides must come together to run the parliament

    अत्यंत महत्त्वाचे असे पावसाळी अधिवेशन खासदारांच्या गदारोळी वर्तणुकीमुळे वाया गेले. मला कोणाला अनावश्यक जबाबदार धरायचे नाही किंवा कुणावर दोषारोपही करायचे नाहीत. परंतु येते हिवाळी अधिवेशन तरी विरोधी आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन उत्तम चालवावे, असे परखड बोल देवेगौडा यांनी सुनावले आहेत.

    राज्यसभेत काल झालेला अभूतपूर्व गदारोळ, सभापती व्यंकय्या नायडू यांनी गाळलेले अश्रू, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या उद्वेगजनक प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधक आणि सत्ताधारी यांना सुनावलेले खडे बोल डोळ्यात अंजन घालणारे आहेत.

    ते म्हणाले, की भारतासारख्या गरीब देशात प्रचंड खर्च करून संसदेचे अधिवेशन भरवले जाते. तेथे उच्च पातळीवर आणि दर्जेदार वाद-विवाद होऊन जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविले जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार साधक-बाधक चर्चा करून कायदे बनविणे अपेक्षित आहे. अशा पवित्र सभागृहांमध्ये कोणत्याही संसद सदस्याने आपली मर्यादा ओलांडून संसदेच्या गरिमेल्ला धक्का लावणे अपेक्षित नाही. परंतु हे वारंवार घडल्यामुळे संसदेचा महत्त्वाचा वेळ वाया गेला. यातून देशाची प्रतिमा जगात चांगली झाली, असे कोणीच म्हणणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत देवेगौडा यांनी कानपिचक्या दिल्या.

    संसदेचे कामकाज बंद पाडून सर्व विरोधी पक्ष आज विजय चौकात “लोकशाही वाचवा” असा गदारोळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी सदस्यांनी पैकीच असणाऱ्या आणि दक्षिणेतील राज्यातून येऊन देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या देवेगौडा यांनी त्यांनाच खडे बोल सुनावले हे महत्त्वाचे मानले पाहिजे.

    blame anybody but House must function. All seniors leaders of both sides must come together to run the parliament

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य