• Download App
    अमेरिकेच्या २० वर्षांच्या अफगाण मोहिमेवर पुतीन यांनी केली सडकून टीका । Bladimir Putin targets USA for afghan debacle

    अमेरिकेच्या २० वर्षांच्या अफगाण मोहिमेवर पुतीन यांनी केली सडकून टीका

    वृत्तसंस्था

    मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. चीनप्रमाणेच त्यांनीही आता अमेरिकेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. Bladimir Putin targets USA for afghan debacle

    ते म्हणाले अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या २० वर्षांच्या मोहिमेचा शेवट फक्त शोकांतिका अन् फक्त हानीत झाला. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने आपले नियम लादण्याचा प्रयत्न दोन दशके केला. हा प्रकार व्यर्थ ठरला. यातून अमेरिकेची केवळ हानीच झाली. याहून जास्त नुकसान अफगाण भूमीवर राहणाऱ्या जनतेचे झाले. कोणतीही गोष्ट बाहेरून लादणे अशक्य असते.

    इतर देशांवर त्यांची मूल्ये लादण्याच्या प्रयत्नांबद्दल पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांच्या नेहमीच टीका केली आहे. अफगाणिस्तानबाबत अमेरिकेच्या धोरणावरही त्यांनी टीका केली आहे. पाश्चात्त्य देश अफगाण निर्वासितांना रशियाची मैत्री असलेल्या मध्य आशियातील देशांत घुसविण्याचा प्रयत्न करीत असल्याची दावाही पुतीन यांनी केला आहे.

    अफगाणिस्तानबाबत ढवळाढवळ करणार नाही असे पुतीन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सोव्हिएत महासंघाच्या काळात त्या देशावर ताबा मिळविण्यात आला होता. त्यापासून धडे घेतल्याचे पुतीन यांनी सांगितले. त्यामुळे काबूलमधील नव्या नेतृत्वाबाबत रशियाने फक्त सावधपणे आशावादी दृष्टिकोन ठेवला आहे.

    Bladimir Putin targets USA for afghan debacle

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार