• Download App
    दक्षिण गोव्यात भाजपचे सरप्राईज; शेफाली वैद्यांसह 3 महिला उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा!!|BJP's surprise in South Goa; Hot discussion on names of 3 women candidates with Shefali Vaidya!!

    दक्षिण गोव्यात भाजपचे सरप्राईज; शेफाली वैद्यांसह 3 महिला उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : लोकसभा निवडणुका प्रत्यक्षात जाहीर होण्यापूर्वीच भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर गोव्यातून श्रीपती येसो नाईक यांना पक्षाने संवेदन संधी दिली, तर दक्षिणेत यंदा “महिला राज” आणण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जात आहे. दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवार उभी करण्याचे घाटत आहे. यात शेफाली वैद्य, सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे या 3 महिलांची नावे आघाडीवर असून यापैकी एका महिलेच्या नावावर भाजपचे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करतील, अशी अपेक्षा आहे.BJP’s surprise in South Goa; Hot discussion on names of 3 women candidates with Shefali Vaidya!!

    भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या पहिल्या 195 उमेदवारांच्या यादीत श्रीपाद नाईकांना सहाव्यांदा संधी देण्यात आली. दक्षिणेत मात्र भाजप नवा चेहरा देऊ शकतो. याबाबत दिल्लीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दक्षिणेतील उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.



    दक्षिण गोव्यात माजी खासदार नरेंद्र सावईकर यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार की माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर किंवा दामू नाईक यांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम असताना, आता दक्षिणेत भाजप महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची चर्चा समोर आली आहे. दक्षिणेत गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे भाजप दक्षिणेत सावध घेत आहे.

    दक्षिणेतील उमेदवार “विनिंग मेरिट”वर ठरवला जाणार की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, भाजपचे नेतृत्व मात्र या सगळ्या गृहीतकांना धक्का देत वेगळाच विचार करत असल्याचे समोर येत आहे. भाजप दक्षिण गोव्यातून सरप्राईज काँट्रेट म्हणून यावेळी महिला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या शक्यतेला दुजोरा दिला गोवा प्रदेश भाजप गोवा दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवारांचीच संभाव्य नावे पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, दक्षिण गोव्यातून भाजप प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांचा नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप वरिष्ठांकडून शेफाली वैद्य यांचे नाव सुचवले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

    गोव्यातील उमेदवारीबाबत दिल्लीत बैठका सुरु असताना भाजप गोव्यातील एका जागेवर महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची चर्चा होती. पण, नाव समोर आले नव्हते. आता हे नाव शेफाली वैद्य असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे यांच्या नावांची देखील चर्चा आहे.

    मूळच्या दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथील रहिवासी असणाऱ्या शेफाली वैद्य यांना भाजप उमेदवारी देणार का इतर दोन पर्यायांपैकी एकाला संधी देणार की पुरुष उमेदवाराची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

    कोण आहेत शेफाली वैद्य?

    शेफाली वैद्य प्रसिद्ध लेखिका असून, त्या विविध वर्तमानपत्रातून स्तंभलेखन करतात. मूळ दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी येथील रहिवासी असून, त्या सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. शेफाली वैद्य सोशल मिडियावर सतत सक्रिय असतात. अनेक विषयांवर त्या प्रखर भूमिका मांडत असतात. भाजपच्या समर्थनात पोस्ट करतात. शेफाली वैद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असून भाजपसाठी उघड भूमिका घेताना दिसतात. अनेक सोशल मिडिया त्यांनी विरोधी पक्षांची चिरफाड केल्याच्या पोस्ट व्हायरल होत असतात. प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे.

    दक्षिण गोव्यातील उमेदवारी बाबत त्यांनी स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सूचक पोस्ट लिहिली आहे. अनेक जण आपल्यासाठी शांतपणे काम करत असल्याचे त्यांनी नमूद करून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी बाबत सस्पेन्स वाढवला आहे.

    BJP’s surprise in South Goa; Hot discussion on names of 3 women candidates with Shefali Vaidya!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते