• Download App
    उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट; रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार । BJP's start campaign to capture Uttar Pradesh; Aim to win 300 seats in UP Election

    उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट; रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तसेच केलेले काम रिपोर्ट कार्डद्वारे जनतेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. BJP’s start campaign to capture Uttar Pradesh; Aim to win 300 seats in UP Election

    पुढील वर्षी देशाचे राजकारण ठरविणारी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सामान्यांची नाळ अगोदरच भाजपने हिंदुत्वाने जोडली आहे. आता राज्यव्यापी गरीब कल्याण संमेलनात भाजपा आमदार आणि मंत्री आजवर केलेल्या कामांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार आहेत.

    हे संमेलन २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये राज्य सरकारच्या सरकारी योजना घरोघरी पोचविण्यात येतील. बूथ लेव्हलवर मंत्री आणि आमदार सामान्य लोकांना भेटतील.



    भाजपा प्रवक्ता मनीष शुक्ला म्हणाले, अशा यात्रांद्वारे आम्ही सामान्य लोकांमध्ये जाणार आहोत. याद्वारे आम्ही केलेली कामे लोकांना सांगू शकतो.
    उत्तर प्रदेश भाजपाचे जवळपास २.५ कोटी सदस्य आहेत. हे सदस्य ४ कोटी बनविण्याचे लक्ष्य आहे. जर सदस्य ४ कोटी झाले तर राज्यात भाजप सहज ३०० हून अधिक जागा जिंकेलं. यामुळे आणखी १.५ कोटी सदस्य बनविण्याचा प्रयत्न आहे. भाजपा उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम हाती घेणार आहे.

    शेतकरी संमेलन १८ सप्टेंबरला

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबरला शेतकरी संमेलन आयोजित केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी राधा मोहन सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आदी सहभागी होतील.

    BJP’s start campaign to capture Uttar Pradesh; Aim to win 300 seats in UP Election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार