• Download App
    लोकजनशक्ती पक्षात संघर्ष सुरू असताना भाजपचे मौन वेदनादायक, मोदींचे हनुमान चिराग पासवान यांची खंत|BJP's silence is painful while Lok Janshakti party is struggling, Modi's Hanuman Chirag Paswan's grief

    मी मोदींचा ‘हनुमान’… पण भाजपचे मौन वेदनादायक; चिराग पासवान यांची खंत

    लोकजनशक्ती पक्षात संघर्ष सुरू असताना भाजपचे मौन वेदनादायक आहे, अशी खंत स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून घेणारे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे. ‘भाजपशी असलेले संबंध एकतर्फी राहणार नाहीत, तसेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू राहिल्यास राजकीय भवितव्याबाबत मी सर्व शक्यतांचा विचार करीन, असेही ते म्हणाले.BJP’s silence is painful while Lok Janshakti party is struggling, Modi’s Hanuman Chirag Paswan’s grief


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकजनशक्ती पक्षात संघर्ष सुरू असताना भाजपचे मौन वेदनादायक आहे, अशी खंत स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून घेणारे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे.

    ‘भाजपशी असलेले संबंध एकतर्फी राहणार नाहीत, तसेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू राहिल्यास राजकीय भवितव्याबाबत मी सर्व शक्यतांचा विचार करीन, असेही ते म्हणाले.’पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान म्हणाले,



    माझे वडील रामविलास पासवान आणि मी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसोपबत कायम उभे राहिलो; मात्र, कठीण काळात हस्तक्षेपाची अपेक्षा असताना भाजप माझ्यासोबत उभा राहिला नाही. आपल्याबरोबर कोण उभे आणि कोण नाही याच्या आधारावर लोक जनशक्ती पक्ष राजकीय भवितव्याचा निर्णय घेईल.

    लोक जनशक्ती पक्षात ‘जेडीयू’ फूट पाडत असताना भाजपने गप्प राहणे योग्य नसल्याचेही चिराग पासवान यांनी म्हटले आहे. भाजपने हस्तक्षेप करावा अशी माझी अपक्षा होती. मात्र, त्यांचे मौन निश्चितच वेदनादायी आहे, असेही पासवान म्हणाले.

    लोक जनशक्ती पक्षातील घडामोडी हा त्यांच्या अंतर्गत मुद्दा असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जेडीयू’ने माज्या पक्षात फूट पाडण्यासाठी भूमिका बजावल्याचा आरोपही चिराग पासवान यांनी केला.

    BJP’s silence is painful while Lok Janshakti party is struggling, Modi’s Hanuman Chirag Paswan’s grief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी