• Download App
    भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांचा चमत्कार; दीव नगरपालिकेच्या सर्व जागांवर भाजपचा भगवा!! BJP's saffron in all the seats of Diu municipality

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांचा चमत्कार; दीव नगरपालिकेच्या सर्व जागांवर भाजपचा भगवा!!

    प्रतिनिधी

    दीव : केंद्रशासित प्रदेश दीव दमण मधील दीव नगरपालिका निवडणूकीत भाजपने मोठा राजकीय चमत्कार घडवला असून नगरपालिकेच्या सर्व 13 जागांवर भाजपने आपला भगवा फडकवला आहे. नगरपालिकेच्या 6 जागांवर आधीच बिनविरोध निवडणूक होऊन भाजपचे 6 नगरसेवक नगरपालिकेत पोहोलेच होतेच. त्यानंतर 7 जागांवर निवडणूक होऊन त्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा पूर्णपणे साफ झाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत 15 वर्षानंतर 100 % टक्के यश मिळवून भाजप सत्तेवर आला आहे. BJP’s saffron in all the seats of Diu municipality

    नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असले तरी त्यांना एकही जागेवर यश मिळवता आले नाही. बाकीचे स्थानिक पक्ष भाजपच्या जवळपासही पोहचू शकले नाहीत. दीव नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या रूपाने एखाद्या राजकीय पक्षाला 100 % टक्के यश मिळाले आहे. दीव नगरपालिकेवर गेल्या 15 वर्षात काँग्रेसची सत्ता होती. पण त्या पक्षाला 100 % यश कधीही मिळू शकले नव्हते. भाजपने मात्र हा राजकीय चमत्कार करून दाखवला आहे.

    दीव दमणचे प्रदेशाध्यक्ष दीपेश टंडेल, राष्ट्रीय सचिव आणि प्रदेश प्रभारी श्रीमती विजया रहाटकर, खासदार लालू भाई पटेल, निवडणूक प्रभारी विशाल टंडेल, जिल्हाध्यक्ष बिपिन शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवून 100 % यश मिळवले.

    या विजयामध्ये उपाध्यक्ष किरीट वाजा, जिल्हा प्रभारी जिग्नेश पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा अमृता बामनिया, वरिष्ठ नेते रामजी पारसमणी, दमण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नवीन पटेल आणि निवडणूक प्रबंध समितीचे सचिव बी एम माछी यांचे मोठे योगदान राहिले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने हा अभूतपूर्व विजय मिळवण्याची प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. मोदी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचे सगळे श्रेय दीवची जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना आहे, अशा नम्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

    दीव नगरपालिकेचे सर्व नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील आणि दीवच्या विकासात योगदान देतील, अशा भावना प्रदेशाध्यक्ष दीपेश टंडेल यांनी व्यक्त केल्या.

    दीव नगरपालिकेवर निवडून आलेले 9 नगरसेवक 45 वर्षांपेक्षा कमी वयाचे युवक आहेत. यामध्ये 7 महिला आहेत. नगरसेवकांचे जास्तीत जास्त वय 54 आहे. यामुळे नगरपालिकेला नवीन रूप आणि नवीन चेहरा देण्याचे कामच भाजपने या निवडणुकीच्या निमित्ताने केल्याचे स्पष्ट होते.

     

    – विजयी उमेदवार असे :

    वॉर्ड नं. आरक्षण विजयी

    1 (जनरल) सुनीत श्यामजी सोलंकी

    2 (जनरल) चिंतक सोलंकी

    3 (महिला) भावना दुधमल

    4 (जनरल) क्रिडेन जयंतीलाल

    5 (जनरल) दिनेश कापड़िया

    6 (महिला) नीता संदीप जाधव

    7 (महिला) करुणा रवि सोलंकी

    8 (महिला) वनश्री सुरेश सोलंकी

    9 (जनरल) हरेश कापडिया

    10 (महिला) हीना रतिलाल सोलंकी

    11 (जनरल) विपुलकुमार सोलंकी

    12 (महिला) हर्षिदा सोलंकी

    13 (महिला – एससी) हेमलता सोलंकी

    BJP’s saffron in all the seats of Diu municipality

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली