• Download App
    उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय; खुसपटी विश्लेषकांची चर्चा "दमदार" विरोधी पक्षाची...!! BJP's resounding victory in Uttar Pradesh under the leadership of Yogi;

    U. P. Elections : उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय; खुसपटी विश्लेषकांची चर्चा “दमदार” विरोधी पक्षाची…!!

    उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीत 300 चा आकडा गाठणाऱ्या भाजपने सध्या 300 च्या आतली कामगिरी केल्यामुळे काही खुसपटी म्हणजे सतत खुसपटे काढणाऱ्या विश्लेषकांनी विविध चॅनेलवर आणि सोशल मीडियातून “दमदार” विरोधी पक्षाची चर्चा सुरू ठेवली आहे. अर्थातच हा दमदार विरोधी पक्ष अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आहे. अखिलेश यादव यांना कसे 125 जागा मिळवण्यात यश मिळाले, भाजपला आता राज्य करणे कसे उत्तर प्रदेशात सोपे नाही, विधानसभेत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचा सामना करताना भाजपची आणि योगी आदित्यनाथ यांची कशी दमछाक होईल, अशा चर्चेचा रतीब खुसपटी विश्लेषकांनी काढला आहे.BJP’s resounding victory in Uttar Pradesh under the leadership of Yogi;

    त्यापलीकडे जाऊन हा विजय नेमका मोदींचा की योगींचा…??, हिंदुत्वाचा अतिरेकी हिंदू राष्ट्रवादाचा…?? की डबल इंजिन सरकारचा…?? वगैरे चर्चेचा रतीब खुसपटी विश्लेषक विविध चॅनेलवर घालताना दिसत आहेत.

    प्रत्यक्षात केवळ योगी आदित्यनाथ यांनी वैयक्तिक करिष्माच्या बळावर हा विजय मिळवलेला नाही. खुद्द योगी आदित्यनाथ यांचा देखील तसा दावा नाही. तर भाजपची संघटनात्मक मजबुती, पंतप्रधान मोदींचा मतदारांवरचा प्रभाव, योगी आदित्यनाथ यांचे “बुलडोझरी कौशल्याचे नेतृत्व” या संमिश्र बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. परंतु खुसपटी विश्लेषकांच्या चर्चेत त्याचा पुसटसा उल्लेखही नाही.

    – केतकरांचे खुसपटी विश्लेषण

    उलट योगी आदित्यनाथ यांचा विजय म्हणजे भगवाधारी हिंदुत्ववादाचा विजय. हिंदुत्ववादी पक्षाला 40 % मते मिळाली याचा अर्थ 60 % मते त्यांच्या विरोधात आहेत, असा अजब अर्थ पुन्हा एकदा असेच खुसपटी विश्लेषक जेष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेतले खासदार कुमार केतकर यांनी “चॅनेली चर्चेत” काढला आहे. भाजपने केंद्रातल्या 57 योजना यशस्वीरित्या राबविल्याचा, त्यातून नवीन “जेंडर वोटर”, “क्लास वोटर” तयार झाल्याचा मागमुसही या खुसपटीत चर्चेत दिसत नाही…!!

    योगी आदित्यनाथ यांचा विजय झाल्याची पोटदुखी एक वेळ समजता येईल, पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सलक सपाटून मार खात असलेल्या काँग्रेसच्या पराभवाचे “केतकरी खुसपटी विश्लेषण” काय…?? तर काँग्रेस धर्मवादी अथवा प्रादेशिक अस्मितावादी राजकारण करू शकत नाही हा…!! म्हणजे जनतेने गांधी परिवारातले पन नाशिक पोहोचलेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व आता संपूर्णपणे नाकारले हे सत्य देखील “खुसपटी विश्लेषक” पत्रकार कुमार केतकर स्वीकारायला तयार नाहीत हेच यातून स्पष्ट झाले…!!

    BJP’s resounding victory in Uttar Pradesh under the leadership of Yogi;

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!