• Download App
    भाजपचा नव्या चेहऱ्यांचा प्रयोग वेगळा वाटतो, कारण बाकी सगळेच घराणेशाही पोसणारे पक्ष; पंतप्रधान मोदींचा टोला BJP's new faces seems new experiment because all others are dynastic parties, says PM Modi

    भाजपचा नव्या चेहऱ्यांचा प्रयोग वेगळा वाटतो, कारण बाकी सगळेच घराणेशाही पोसणारे पक्ष; पंतप्रधान मोदींचा टोला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्री पदावर नवीन चेहरे बसविले याचे माध्यमांसकट सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याचे उदाहरण मी स्वतःच आहे. भाजपने केलेला नव्या चेहऱ्यांचा प्रयोग वेगळा वाटतो कारण बाकी सगळेच घराणेशाहीचे पक्ष आहेत, असा परखड टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. BJP’s new faces seems new experiment because all others are dynastic parties, says PM Modi

    इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसह विविध विषयांवर भाष्य केले. त्यामध्ये भाजपने केलेल्या वेगवेगळ्या संघटनात्मक प्रयोगांवरचे भाष्य विशेषत्वाने वेगळे ठरले.


    सीएम ममता बॅनर्जी यांचा दावा- बंगालमध्ये भाजप आणि I.N.D.I.Aची मिलीभगत, जागावाटपात तडजोड करणार नाही


    पंतप्रधान मोदी म्हणाले :

    भाजपने तीन राज्यांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी दिली. नवे चेहरे मुख्यमंत्रीपदावर आणले त्याचे माध्यमांसह सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पण नव्या चेहऱ्याचे उदाहरण तर मी स्वतःच आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी मला नेमले, तेव्हा माझ्याकडे कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता. कोणतीही निवडणूक मी स्वतः लढवली नव्हती, तरीदेखील संघटनेच्या आधारावर मी मुख्यमंत्रीपदापासून ते निवडणुकीपर्यंत सगळ्या गोष्टी पेलू शकलो. तसेच हे नवे मुख्यमंत्री काम करू शकतील.

    पण मूळात भाजप सारख्या केडर बेस पक्षाला “नवे चेहरे” हा प्रयोग नवा नाही भाजपचे गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पाहिले तरी त्याची प्रचिती येईल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधले हे अध्यक्ष आहेत.

    भाजपचा नव्या चेहऱ्यांचा प्रयोग सगळ्यांना वेगळा वाटतो कारण भाजपचे सगळेच प्रतिस्पर्धी पक्ष घराणेशाहीवर पोसलेले आहेत. त्यांच्याकडे वडिलांकडून मुलगा अथवा मुलीकडे पक्षाचा वारसा येतो. भाजपमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पक्षाचे नेतृत्व सहज सोपविले जाते. संपूर्ण पिढी नेतृत्वक्षम करण्याची क्षमता भाजपच्या संघटनेत आहे. तेवढी क्षमता अन्य कुठल्याही पक्षांमध्ये दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांचा प्रयोग नवीन नसला तरी इतर पक्षांना आणि माध्यमांना तो प्रयोग नवीन वाटतो.

    BJP’s new faces seems new experiment because all others are dynastic parties, says PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य