विशेष प्रतिनिधी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे.भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी सुरू झाल्यावर बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ लागले आहेत.BJP’s move towards big victory in Belgaum Municipal Corporation, shocking defeat of Maharashtra Unification Committee
बेळगावमहानगरपालिका निवडणूक यावेळी प्रथमच पक्षीय पातळीवर लढली गेली.महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायक पराभव होत आहे.
विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार पराभूत झाले आहेत.भाजपची वाटचाल जोरदार सुरू झाल्याने आणि सर्वच उमेदवारांनी जास्तीत जास्त विजयाकडे वाटचाल केल्याने निवडणुकीचा निकाल सध्यातरी भाजपच्या बाजूने लागत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिक पक्षाकडे बघून नव्हे तर स्थानिक उमेदवाराच्या कामाकडे बघून मतदान करतात .मात्र यावेळीएकगठ्ठा मतदान भाजपला झाले आहे,
BJP’s move towards big victory in Belgaum Municipal Corporation, shocking defeat of Maharashtra Unification Committee
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीच्या चौकशीला सामोरे जायलाच आलोय; ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर
- सरसंघचालक भागवत आज मुस्लिम विद्वानांना भेटणार, इन्फोसिसवरील संघाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखापासून राखले अंतर
- उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्यावर गुन्हा दाखल, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आरोप
- इम्रान खान यांचे पुन्हा विखारी वक्तव्य! धमकी देत म्हणाले – भारताचा ‘खरा चेहरा’ जगासमोर आणू