प्रतिनिधी
जयपूर : देशभरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावधानतेचा इशारा दिला असताना तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री महसूल मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून काँग्रेसची भारत जोडो यात्रा स्थगित करण्याची विनंती केली असताना काँग्रेसने हा सल्ला धुडकावून भारत जोडो यात्रा सुरूच ठेवली आहे. ही यात्रा सध्या हरियाणात आहे. BJP’s Janakrosh yatra postponed in Rajasthan to avoid the threat of Corona
या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राजस्थानात काढलेली जनआक्रोश यात्रा विशिष्ट कालमर्यादेपर्यंत स्थगित केली आहे. राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी एक व्हिडिओ निवेदन जारी करून जनआक्रोश यात्रे संदर्भात प्रदेश भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. जनआक्रोश यात्रा राजस्थानात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत सुमारे 2 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली असून तब्बल 92 लाख लोकांना प्रत्यक्ष संपर्क करून जनआक्रोश यात्रेचा उद्देश समजावून सांगितला आहे. 14 लाख लोकांच्या विविध तक्रारी भाजपला प्राप्त झाल्या आहेत.
राजस्थानात काँग्रेसची राजवट किती जुलमी आहे, या विषयीच्या असंख्य तक्रारी लोकांनी भाजपच्या या जनआक्रोश यात्रेत केल्या आहेत. ही जन आक्रोश यात्रा प्रचंड यशस्वी झाली असून राजस्थानच्या जनतेचा आवाज सरकारपर्यंत भाजप पोचवत आहे. परंतु सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विशिष्ट कालमर्यादेपर्यंत ही जनआक्रोश यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे, अशी माहिती सतीश पुनिया यांनी दिली आहे.
कोरोना नियम पाळून जनआक्रोश सभा
त्याच वेळी त्यांनी राजस्थानात आगामी काळात 42 ठिकाणी जनआक्रोश सभा होणार आहेत, त्या मात्र नियोजित वेळेनुसार आणि नियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. या सर्व सभांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार निर्देशित करणार असलेल्या सर्व कोरोना प्रतिबंधांचे आणि नियमावलीचे पालन करण्यात येईल, अशी ग्वाही देखील सतीश पुनिया यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने केलेल्या सर्व सूचनांकडे काँग्रेसने दुर्लक्ष करून भारत जोडो यात्रा सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपच्या जनआक्रोश यात्रा स्थगित करण्याच्या निर्णयाचे सोशल मीडियात स्वागत होत आहे.
BJP’s Janakrosh yatra postponed in Rajasthan to avoid the threat of Corona
महत्वाच्या बातम्या