विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीत नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही, पण दुसरीकडे जुनेच मित्र नव्याने जोडण्यावर भाजपने जोर दिला आहे. राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेत मग्न आहेत. काँग्रेसच्या यादीचा पत्ता नाही. INDI आघाडीतले नेते रोज कुठे ना कुठेतरी बैठका घेत आहेत, पण त्यांचेही जागावाटपावर एकमत होत नाही. BJP’s emphasis on making new friends
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी मात्र आपले जुने मित्र नव्याने जोडण्यावर भर देत आहे. ओडिशा मध्ये बिजू जनता दल – भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू भाजपच्या परत प्रेमात पडून तेलगू देशम पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश मिळवत आहेत. त्यांच्याच बरोबर अभिनेते पवन कल्याण हे देखील राष्ट्रीय लोकशाहीत आघाडीत यायला उत्सुक आहेत. त्यांनी या दोन्ही नेत्यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले तर दक्षिणेतील राज्य आंध्र प्रदेशात भाजपचा राजकीय बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता आहे.
भाजपने आधीच तब्बल 195 उमेदवारांची यादी जाहीर करून लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत INDI आघाडीच्या फक्त बैठका सुरू आहेत. अजून जागावाटपाचा पत्ताच लागलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा जास्त आणि काम कमी, अशी स्थिती आहे. उलट प्रकाश आंबेडकर आघाडीतल्या बैठकांमधली “सिक्रेट्स” जाहीरपणे सांगायला लागले आहेत. पण यातून प्रत्यक्षात दोन्ही आघाड्यांचा मिलाफ होण्याची शक्यता दुरावत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मात्र जुने मित्र पक्ष नव्याने पुन्हा आघाडीत सामील होत आहेत, यातून देशातल्या राजकीय पक्षांचा झुकाव कुठल्या बाजूने आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
BJP’s emphasis on making new friends
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला “तुपे पाटील” प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!!
- नरसिंह रावांच्या संकटमोचकाची कन्या भाजपमध्ये; पद्मजा करुणाकरण – वेणुगोपाल यांचा पक्षप्रवेश!!
- Delhi Liquor Policy: संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; कोर्टाने पुन्हा वाढवली कोठडी