• Download App
    Sukhvinder Singh Sukhu हिमाचलची आर्थिक स्थिती आणि कर्नाटकातील

    Sukhvinder Singh Sukhu : हिमाचलची आर्थिक स्थिती आणि कर्नाटकातील भ्रष्टाचारावर भाजपचा तीव्र हल्ला!

    राहुल गांधींनी दिलेल्या आश्वासनांवरूनही टोला लगवाला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू  ( Sukhvinder Singh Sukhu )यांनी हिमाचल प्रदेशच्या कमकुवत आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकल्यानंतर भाजपने काँग्रेसला धारेवर धरले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी टोमणा मारला की, राहुल गांधी लोकांच्या खात्यात पैसे येतील, असे म्हणायचे. पैसे लगेच आले नाहीत, पण दिवाळखोरी नक्कीच लवकर आली.

    ते म्हणाले की, देशातील नऊ पहाडी राज्यांपैकी हिमाचलची आर्थिक स्थिती सर्वात वाईट असल्याचे सर्वांना स्पष्ट झाले आहे. सध्या दरडोई कर्जामध्ये हिमाचल हे देशातील दुसरे राज्य आहे. राज्यावर सध्या ८७ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून ते पुढील आर्थिक वर्षापूर्वी १ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.



     

    राज्याचे वार्षिक बजेट ५८४४४कोटी रुपये आहे. यातील ४२०७९ कोटी रुपये दरवर्षी फक्त पगार, पेन्शन आणि कर्जाची परतफेड यावर खर्च होतात. याच हिमाचलमध्ये काँग्रेसने जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, पण आजतागायत ती लागू करण्याचे धाडस दाखवले नाही.

    प्रेम शुक्ला म्हणाले की, कर्नाटकची हीच स्थिती आहे. तेथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार न पोहोचल्याने त्यांना संपावर जावे लागले. सरकारने दूध, पेट्रोल-डिझेल आणि पाण्याच्या किमती वाढवल्या आणि सिद्धरामय्या सरकारने प्रीमियम दारूच्या किमती कमी केल्या.

    हे लुटीचे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. सिद्धरामय्या यांचे संपूर्ण कुटुंब मूडा जमीन घोटाळ्याच्या आरोपांच्या छायेत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे आधीच भ्रष्टाचाराने घेरले आहेत. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबाचा जमीन घोटाळा समोर आला आहे.

    BJPs attack on Himachals financial condition and corruption in Karnataka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!