वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक मोठा दावा केला आहे. गुजरात मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने भाजपची आतून संधान बांधले आहे, पण लोकांमध्ये भाजप सरकार विरोधात एवढा रोष आहे, की काँग्रेस गुजरात विधानसभेच्या 125 जागा जिंकेल, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी केला आहे. BJP’s alliance with Kejriwal, but Congress got 125 seats
अशोक गेहलोत हे सध्या गुजरात मध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अशोक गेहलोत यांनी प्रामुख्याने आपले टार्गेट अरविंद केजरीवाल यांच्यावर ठेवले. पंजाबची निवडणूक जिंकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेशात आपले लक्ष केंद्रित केले होते. तेथे धडाक्यात प्रचाराला सुरुवातही केली होती. परंतु, अचानक त्यांनी तिथला प्रचार थांबवला आणि ते गुजरात कडे वळले. याचे राजकीय रहस्य समजून घेतले पाहिजे, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.
केजरीवाल्यांच्या आम आदमी पार्टीने भाजपशी आतून संधान बांधले आहे. काँग्रेसची मते फोडून त्यांना भाजपला मदत करायची आहे. परंतु गुजरात मध्ये जनतेमध्ये सध्याच्या भाजप सरकार विषयी एवढा रोष आहे की काँग्रेस येथे 125 जागा जिंकेल. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक 2021 मध्ये झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरात मध्ये वारंवार खेटे घालायला लागले. त्यांच्या हे निश्चित लक्षात आले की आपण गेलो नाही तर गुजरात मध्ये भाजपची अक्षरशः धुळधाण होईल.
पण त्यांनी कितीही फेऱ्या मारल्या तरी गुजरातची जनता आता भाजपच्या कोणत्याही आश्वासनाला भूलणार नाही. गुजरात मध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. ती जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणूक 125 जागा काँग्रेस जिंकेल, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे.
BJP’s alliance with Kejriwal, but Congress got 125 seats
महत्वाच्या बातम्या
- गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री पटेलांना नवे टार्गेट; नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे; पण कसे?, ते वाचा
- ठाकरे – आंबेडकर एकत्र; महाराष्ट्रात पंचरंगी लढतीची नांदी
- राहुलजींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातल्या अखेरच्या दिवशीही सावरकरांच्या मुद्द्यावर जयराम रमेश यांनी पुन्हा डिवचले
- महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभात पंतप्रधान राजीव गांधींसमोर लतादीदींचे सावरकरांच्या ज
- राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!