• Download App
    संपूर्ण तामिळनाडू पादाक्रांत करण्यासाठी भाजपची 6 महिन्यांची 234 मतदारसंघांची पदयात्रा!! BJP's 6-month march to 234 constituencies to sweep entire Tamil Nadu

    संपूर्ण तामिळनाडू पादाक्रांत करण्यासाठी भाजपची 6 महिन्यांची 234 मतदारसंघांची पदयात्रा!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : दक्षिण भारतात तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्यात आपला फूटप्रिंट अजिबात नाही, हा राजकीय कलंक पुसून टाकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून संपूर्ण तामिळनाडू पदाक्रांत करण्यासाठी 1 – 2 नव्हे, तर तब्बल 6 महिन्यांची विधानसभेच्या सर्व 234 मतदारसंघांची पदयात्रा काढण्याची मोहीम पक्षाने आखली आहे. BJP’s 6-month march to 234 constituencies to sweep entire Tamil Nadu

    माजी आयपीएस अधिकारी आणि तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई या पदयात्रेचे नेतृत्व करणार आहेत. “बीजेपी4तमिळनाडू” ही या पदयात्रेची घोषणा आहे. तमिळ संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांचा संगम या यात्रेतून साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

    त्याचबरोबर भाजप फक्त उत्तर भारतातल्या गाय पट्ट्यातला राजकीय पक्ष असल्याचा राजकीय कलंक पुसणे हा देखील या यात्रेमागचा हेतू आहे. आत्तापर्यंत भाजपने कधीही एकत्रितरित्या तामिळनाडूतल्या सर्व 234 मतदार संघांमध्ये अशी कोणतीही मोहीम राबविली नव्हती, ती प्रभावी मोहीम पदयात्रेच्या निमित्ताने राबविण्यात येणार आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सर्व 234 मतदारसंघांमध्ये लाभार्थींच्या भेटीगाठी आणि 10 मोठ्या रॅलीज आयोजित केल्या आहेत. 11 जानेवारी 2024 पर्यंत यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा करण्याची योजना आहे आणि या 10 रॅलीज मध्ये केंद्रीय मंत्री येऊन भाषणे करणार आहेत.

    तामिळनाडूवर आत्तापर्यंत द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोनच पक्षांची राजवट राहिली आहे. काँग्रेस तिथे कायम दुय्यम अथवा तिय्यम स्थानावर राहिली. पण आता भाजप अण्णा द्रमूक बरोबर युतीत असला तरी स्वतंत्रपणे 234 मतदारसंघांमध्ये आपले राजकीय संघटन मजबूतपूर्व इच्छित आहे.

    मोदी सरकार परत सत्तेवर आल्यावर दुसरा पदयात्रेचा टप्पा

    पदयात्रेचा दुसरा टप्पा केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यानंतर सुरू करून त्यामध्ये तमिळ – भारत संगम याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राज्यभर घेण्याचा भाजपचा मनसूबा आहे. राज्य भाजपची संपूर्ण फौज आणि केंद्रीय भाजपची संपूर्ण फौज या निमित्ताने तामिळनाडू आपल्या ताकदीनिशी उतरणार आहे.

    – भारतव्यापी भाजप हे खरे टार्गेट

    केवळ 2024 ची लोकसभा निवडणूक हे टार्गेट नसून त्यापलीकडे जाऊन भाजप संपूर्ण भारतव्यापी मजबूत पक्ष असल्याचे दाखवून देणे हा भाजपचा या पदयात्रे मागचा इरादा आहे. त्याचबरोबर अण्णामलाई यांच्यासह तामिळनाडूत भाजप नेत्यांची बळकट फौज उभी करण्याचाही इरादा आहे. म्हणूनच 6 महिन्यांची प्रदीर्घ विधानसभेचे सर्व 234 मतदारसंघ कव्हर करणारी पदयात्रा तामिळनाडू भाजप काढत आहे.

    BJP’s 6-month march to 234 constituencies to sweep entire Tamil Nadu

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!