वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटकात भारत जोडो यात्रेच्या बोलभाल्यात विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयाचा डंका वाजवला आहे. राहुल गांधींची भारत जवळ यात्रा सध्या तेलंगणात असली तरी ती कर्नाटकाचा बहुतांश भाग व्यापून तेलंगणात आली आहे. BJP wins in Vijaypur and other municipal elections in Karnataka on the sway of Bharat Jodo Yatra
दक्षिण कर्नाटकातील चामराज नगर जिल्ह्यातील कोल्लेगल नगरपालिका पोटनिवडणुकीत 7 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर पूर्वीचे विजापूर आणि आत्ताचे विजयपूर या महापालिकेची पहिलीच निवडणूक भाजपने बहुमतासह जिंकली आहे.
कर्नाटकाचा हाच तो परिसर आहे जेथून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मोठा गाजावाजा करून गेली होती. कर्नाटकातले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या यात्रेमुळे फुल चार्ज झाले होते मात्र, महापालिका निवडणुकीमध्ये आणि पोटनिवडणुकीमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. विजापूर महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत एकूण 35 जागांपैकी 17 जागांवर भाजपने विजय मिळवला. 2 जागा भाजपच्या बंडखोरांनी मिळवल्या. 10 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर दोन जागा असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला मिळाल्या आहेत.
काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार फार्म्युला
विजयपूर मध्ये काँग्रेसने सर्व म्हणजे 35 जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. यापैकी 17 उमेदवार मुस्लिम होते. त्यापैकी 6 उमेदवार विजयी होऊ शकले आहेत. बेळगावी मध्ये 18 जागा काँग्रेसने जिंकले आहेत त्यापैकी 9 उमेदवार मुस्लिम आहेत तर कलवरी मध्ये 27 जागा काँग्रेसने जिंकले असून त्यापैकी 18 उमेदवार मुस्लिम आहेत.
विजयपूर सह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार दिले या मुद्द्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसवर मुस्लिमांचे लांगुलचालन चालविल्याचा आरोप केला आहे.
BJP wins in Vijaypur and other municipal elections in Karnataka on the sway of Bharat Jodo Yatra
महत्वाच्या बातम्या
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा
- लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील
- दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वारसांसाठी मेडिकलच्या जागा राखीव; केंद्र सरकारचा निर्णय
- सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज