विशेष प्रतिनिधी
मुंबई : तेलंगणातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार एव्हीएन रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समितीचे पूर्ण राजकीय वर्चस्व असताना शिक्षक मतदार संघात भाजपने त्या पक्षाच्या उमेदवाराला धूळ चारल्याने भाजपमध्ये प्रचंड आनंदाची लाट आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय बंडी यांनी तेलंगणातील उच्चशिक्षितांमध्ये भारत राष्ट्र समिती विरुद्ध लाट असल्याचा दावा केला आहे. पण हा दावा खोटा कसा म्हणता येणार??, असा प्रश्न महाराष्ट्राच्या निमित्ताने निर्माण होत आहे. BJP winning Telangana Teachers’ MLC seat proves anti-incumbency sentiment against BRS
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक मतदार संघात विदर्भात भाजपला पराभवाचा फटका बसला. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये मूळचे काँग्रेस नेते सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडून आले. या निकालांवरूनच महाविकास आघाडीचे नेते अजितदादा पवार, नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात उच्चशिक्षितांमध्ये भाजप आणि शिंदे गट विरोधी लाट असल्याचा दावा केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हाच निकष लावला तर तेलंगणामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून भारत राष्ट्र समितीच्या विरोधात लाट आहे असे स्वीकारायचे का??, हा खरा प्रश्न आहे.
विधान परिषद निवडणूक ही विशिष्ट मतदारांची निवडणूक असते. पदवीधरांसाठी वेगळा मतदारसंघ, शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेगवेगळे मतदारसंघ यात ही निवडणूक होत असते. त्यामुळे ती सार्वत्रिक निवडणुकीसारखी प्रातिनिधिक मानता येत नाही. तरी देखील जर महाविकास आघाडीतले महाराष्ट्रातले नेते विधान परिषद निवडणुकीचा निकष लावून शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध लाट असल्याचा दावा करणार असतील, तर तेलंगणामध्ये देखील त्याच विधान परिषद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतला निकाल पाहता तिथल्या भारत राष्ट्र समिती विरुद्ध जनमानसात लाट आहे हे मान्य करावे लागेल. ते महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते मान्य करतील का?? हा प्रश्न आहे… आणि ते मान्य न केल्यास महाराष्ट्रात देखील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस अथवा महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागले असले तरी शिंदे – फडणवीस सरकार विरुद्ध ती लाट नाही हे देखील त्यांना मान्य करावे लागेल, ही राजकीय वस्तुस्थिती आहे.
BJP winning Telangana Teachers’ MLC seat proves anti-incumbency sentiment against BRS
महत्वाच्या बातम्या
- CJI म्हणाले- कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्या अयोग्य लैंगिक शब्दांवर बंदी घालण्यात येईल, नवीन शब्दकोश लवकरच येणार
- अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??
- Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!
- योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!