• Download App
    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एचडी देवेगौडा यांच्या 'जेडीएस'शी युती करणार! BJP will form an alliance with HD Deve Gowdas JDS for the 2024 Lok Sabha elections

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एचडी देवेगौडा यांच्या ‘जेडीएस’शी युती करणार!

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते  बीएस येडियुरप्पा यांनी दिली माहिती, जाणून किती जागा मिळणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुका JD(S)सोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपासोबतच्या निवडणूक कराराचा भाग म्हणून जेडी(एस) ला लोकसभेच्या चार जागा देण्याचे मान्य केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही वेग दिला आहे. विरोधी आघाडी ‘इंडिया’नेही अनेक बैठका घेऊन एकत्र निवडणुका लढवण्याची रणनीती आखली आहे. BJP will form an alliance with HD Deve Gowdas JDS for the 2024 Lok Sabha elections

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या जेडीएसला भाजपसोबत युती करण्यात रस असल्याचे दिसत आहे. जेडीएसने अलीकडच्या काळात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपाला पाठिंबा दिला आहे. एचडी देवेगौडा यांनी बालासोर अपघातप्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा बचाव केला होता. इतर विरोधी पक्षांचे आवाहन धुडकावून लावल्यानंतर देवेगौडा यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. गुरुवारी भाजपासोबत युतीबाबत विचारले असता देवेगौडा म्हणाले की, असा कोणता पक्ष आहे की जो भाजपसोबत गेला नाही?

    जेडीएसला कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी चार जागांवर निवडणूक लढवायची आहे. मंड्या, हसन, बंगलोर ग्रामीण आणि चिकबल्लापूर या जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. मंड्यातून विजयी झालेल्या सुमलता अंबरीश यांनी भाजपाला पाठिंबा दिला, तर जेडीएसला हसन ही केवळ एक जागा जिंकता आली. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचाही निवडणुकीत पराभव झाला होता.

    BJP will form an alliance with HD Deve Gowdas JDS for the 2024 Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!