छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये मुख्यंत्रीपदाचा चेहरा जाहीर करताना भाजपाने सर्वांचेच अंदाज फोल ठरवल्याचे दिसून आले
विशेष प्रतिनिधी
जयपुर : छत्तीसगडमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विष्णू देव साय आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांना भाजपाने मुख्यमंत्री बनवलं आहे. आता सर्वांच्या नजरा राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाकडे आहेत. असे मानले जात आहे की आज जयपूरमध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, ज्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. BJP will announce the name of new Chief Minister of Rajasthan today
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री निवडले, त्यामुळे राजस्थानच्या दिग्गजांचे टेंशन वाढले आहे. बालकनाथ यांच्या ट्वीट पोस्टनंतर वसुंधरा राजे पुन्हा एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मानले जात होते, मात्र, छत्तीसगड-मध्य प्रदेशनंतर यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अशा परिस्थितीत वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार की राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेन्स कायम आहे. अनेक चेहऱ्यांवर चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.