• Download App
    मणीपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार; २५ जागांवर घेतली आघाडी । BJP to return to power in Manipur; Leading in 25 seats

    मणीपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार; २५ जागांवर घेतली आघाडी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मणिपूरमधील ६० जागांपैकी सत्ताधारी भाजप आता २५ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ९ जागांवर, एनपीएफ ५जागांवर, इतर २१ जागांवर आघाडीवर आहे. BJP to return to power in Manipur; Leading in 25 seats

    मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग त्यांच्या थौबल जागेवरून आघाडीवर आहेत, तर खुरई आणि हेरोक जागेवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

    मणिपूरच्या 5 हॉट सीट्सचा निकाल

    हेनिगांग : विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप आमदार एन. बिरेन सिंह २५९८मतांनी आघाडीवर आहेत. थौबल: काँगेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री असलेले ओकराम इबोबी सिंग ४७२ मतांनी आघाडीवर आहेत.



    युरिपोक : जनता दलाचे के. सुरेश सिंग, भाजपचे के.एच. रघुमणी सिंह १३१ मतांनी पुढे आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री यमनाम जॉयकुमार सिंग मागे पडले आहेत.

    माओ : के.एस. अलेक्झांडर माचो पुढे आहे. एनपीएफचे नेते डिखो येथून पिछाडीवर आहेत. सिंगजामी: खेमचंद सिंग (भाजप) आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे आय. हेमचंद्र सिंग मागे आहेत.

    BJP to return to power in Manipur; Leading in 25 seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री