• Download App
    उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती|BJP to retain power in Uttar Pradesh, success due to improved law and order, Yogi Adityanath most preferred for CM post

    उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पुढील निवडणुका भाजपच जिंकणार असून योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे एबीपी सी-वोटरच्या सर्व्हेतून पुढे आले आहे. मात्र, समाजवादी पक्षाची ताकदही वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची सुधारलेली स्थिी भाजपाच्या यशाचे मुख्य कारण ठरणार आहे.BJP to retain power in Uttar Pradesh, success due to improved law and order, Yogi Adityanath most preferred for CM post

    उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील काही महिन्यांत होणार आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहे. यूपीत सध्या भाजपची सत्ता असून योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षाही अधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपने केला आहे.



    पण या सर्व्हेनुसार भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपा सत्ता राखणार असल्याचेही म्हटले आहे. आगामी निवडणुकीत भाजपला २१३ ते २२१ जागा मिळण्याची शक्यता आहे. समाजवादी पाटीर्ला १५२ ते १६०, बसपाला १६ ते २० आणि इतरांना किमान ६ जागा मिळतील, असा अंदाज सवेर्तून व्यक्त केला आहे.

    मुख्यमंत्री म्हणून जनतेने सर्वाधिक पसंती योगी आदित्यनाथ यांना दिली आहे. योगी आदित्यनाथ ४१ टक्के, अखिलेश यादव यांना ३२ टक्के, मायावती १६ टक्के, प्रियांका गांधींना ५ टक्के, जयंत चौधरींना २ टक्के आणि इतरांना ४ टक्के पसंती सवेर्तून दिली गेली आहे.

    राज्यातील सुधारलेली कायदा आणि सुव्यवस्था भाजपाच्या यशाचे मुख्य कारण ठरणार असल्याचेही सर्व्हेतून दिसून आले आहे. . कायदा आणि सुव्यवस्थेला ३० टक्के, राम मंदिर १४ टक्के, शेतकरी आंदोलन १५ टक्के, बेरोजगारी १७ टक्के, सामाजिक सौहार्द ३ टक्के, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते पाणी ३ टक्के, महागाई १५ टक्के आणि इतर ३ टक्के मुद्द्यांना सर्व्हेतून पसंती देण्यात आली आहे.

    गेल्या महिन्यात ३ ऑक्टोबरला लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाला होता. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारामुळे भाजपचे ६२ टक्के नुकसान होऊ शकते, असे मत सर्व्हेतून व्यक्त करण्यात आले आहे. प्रियांका गांधींच्या सक्रियतेचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असं ४७ टक्के जणांनी सर्वेत म्हटंल आहे.

    BJP to retain power in Uttar Pradesh, success due to improved law and order, Yogi Adityanath most preferred for CM post

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी