वृत्तसंस्था
कोलकाता : निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मधील पोटनिवडणूक जाहीर केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा जीव भांड्यात पडला असला तरी त्यांच्या विधानसभेत निवडून येण्याच्या अडचणी खऱ्या अर्थाने संपलेल्या नाहीत किंबहुना त्या अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे. कारण भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे भवानीपूर मतदारसंघात घुसून त्यांना नंदीग्राम सारखेच पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी भाजपने भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या समोर टक्कर देण्यासाठी बड्या नावांचा विचार केला आहे. BJP to field big shots like Tathagat Roy or Rudranil Ghosh against Mamata Banerjee in Bhavanipore
यामध्ये बंगाल भाजपचे बडे नेते आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय, श्यामाप्रसाद मुखर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिर्बंद गांगुली, बंगाली अभिनेता रुद्रणील घोष आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यापैकी एका वजनदार उमेदवाराला ममता बॅनर्जी यांच्या समोर उतरवून त्यांची राजकीय दमछाक करण्याचा भाजपचा मनसूबा आहे.
भाजपकडे यासाठी बंगाल मधल्या विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा प्रचंड मोठा मुद्दा हातात आहे. ममता बॅनर्जी या स्वतःला कायस्थ ब्राह्मण म्हणवून घेत दुर्गा पूजा वगैरे करत असल्या
तरी त्यांच्या राज्यात हिंदूंवर होणारे अत्याचार हा विषय भाजप निवडणूक प्रचारात पुढे आणणार आहे.
ममता बॅनर्जी यांची जेवढी तयारी आहे. तेवढीच तयारी भाजपने त्यांच्या विरोधात करण्याचा मनसूबा ठेवला आहे. ममता बॅनर्जी जिंकल्या तरी भवानीपूर हा त्यांचा “राजकीय बालेकिल्ला” उरणार नाही याची “व्यवस्था” करण्याचा भाजपच्या नेत्यांचा कसून प्रयत्न असणार आहे.
भवानीपूर बरोबरच जांगीपूर आणि समशेरपूर या दोन मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये देखील पोटनिवडणूक होत आहे. तेथे ममतांनी अर्थातच दोन मुस्लिम उमेदवारांची तृणमूळ तर्फे निवड केली आहे. हाही मुद्दा भाजप भवानीपूरमध्ये अग्रक्रमाने प्रचारात आणणार आहे. भाजपच्या गोटातून ही माहिती देण्यात आली आहे.
BJP to field big shots like Tathagat Roy or Rudranil Ghosh against Mamata Banerjee in Bhavanipore
महत्त्वाच्या बातम्या
- Dhananjay mundhe: करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल : परळीमध्ये तणावाचे वातावरण
- GOOD NEWS NLEM: बहुजन हिताय मोदी सरकार ! अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत सुधारणा ; शुगर-कॅन्सर-कोविडसह ३९ आजारांवरील औषधं स्वस्त
- अयोध्येचे स्वामी परमहंस दास म्हणाले – मुस्लिमांचे नागरिकत्व संपवा, येथे गुलाम म्हणून राहा
- सर्वोच्च भीम पराक्रम; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने कमावली तब्बल 19 पदके…!!