वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी (18 ऑगस्ट) भाजपने जम्मूमध्ये ( Jammu ) बैठक घेतली. केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी किशन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना म्हणाले की, जम्मूमध्ये पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.
दिव्य मराठीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप उमेदवारांची पहिली यादी 21 ऑगस्टला प्रसिद्ध करणार आहे. पुढील आठवड्यापासून पक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात करू शकतो. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह निवडणूक रॅली घेणार आहेत.
जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे नेते जुल्फकार अली यांचा भाजपमध्ये प्रवेश
जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री चौधरी जुल्फकार अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी शनिवारी (17 ऑगस्ट) चौधरी जुल्फकार अली यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
पेशाने वकील असलेल्या जुल्फकार यांनी 2008 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुका राजौरी जिल्ह्यातील दारहल विधानसभेतून पीडीपीच्या तिकिटावर लढवल्या होत्या आणि विजयी झाले होते.
2015 ते 2018 पर्यंत ते मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. रविंदर रैना म्हणाले की, जुल्फकार हे जम्मू-काश्मीरचे मोठे नेते आहेत. त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ मिळणार आहे.
BJP to contest elections alone in Jammu
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार