विशेष प्रतिनिधी
कोलकता : कोलकता शहरातील बनावट लसीकरण मोहिमेच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरले आहे. कोलकता महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले असताना बाचाबाची झाली. पोलिसांनी कोविडमुळे मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले होते. परंतु भाजपने त्याकडे दुर्लक्ष करत मोर्चा काढला. BJP targets TMC govt on vaccination
बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले की, सत्ताधारी पक्ष हे या बोगस अभियानाचा म्होरक्या देबाजन देब आणि तृणमूल नेते आणि केएमसी अधिकाऱ्यांची असलेली मिलीभगत लपविण्याचा प्रयत्न करत आहे. भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी भाजपकडून मोर्चा काढला जात होता, परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. दोन महिन्याच्या कालखंडानंतर मोर्चा काढला आहे.
भाजपचे कार्यकर्ते शांततेत मोर्चा काढत होते, परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली. रितीश तिवारी, अग्निमित्रा पॉलसह अनेक नेत्यांना पकडले आहे. त्यांना लालबाजार मुख्यालयात नेण्यात आले.
भाजपकडून सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कोलकता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. महानगरपालिकेच्या परिसरात मोठी कुमक मागवण्यात आली होती. कोलकत्याच्या सुबोध मलिक चौकात भाजपचे कार्यकर्ते दुपारी बाराच्या सुमारास जमले आणि तेथून मुख्यालयाकडे निघाले. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना सेंट्रल एव्हेन्यूवरच अडवले. त्यावेळी पोलिस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
BJP targets TMC govt on vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक