• Download App
    पन्नास भाजप कार्यकर्त्यांचे मृत्यू झाले पण ममतादीदींचा त्याच्याशी काही देणेघेणे नाही, भाजपचा घणाघाती आरोप |BJP targets Mammata govt.

    पन्नास भाजप कार्यकर्त्यांचे मृत्यू झाले पण ममतादीदींचा त्याच्याशी काही देणेघेणे नाही, भाजपचा घणाघाती आरोप

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – तृणमूल काँग्रेस नेत्याचा खून होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने सूत्रे फिरविली. हेच निवडणूक निकालानंतर भाजपचे ५० कार्यकर्ते मारले गेल्याची त्यांना कोणतीही फिकीर नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.BJP targets Mammata govt.

    पूर्व वर्धमान जिल्ह्यातील मंगलकोट येथे तृणमूल नेते आशिम दास यांचा खून करण्यात आला. त्यानंतर राज्य पोलिसांनी पाच सदस्यीय विशेष तपास पथक तयार केले. यानंतर घोष यांनी वरील आशयाचे ट्विट केले. भाजप कार्यकर्त्यांच्या निर्घृण खुनाचे प्रकार घडलेच नसल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.



    निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या तेव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था निवडणूक आयोगाच्या हातात होती, अशीही तृणमूलची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

    घोष यांचा आरोप तृणमूलच्या बीरभूम जिल्हा शाखेचे प्रमुख अनुब्रत मंडल यांनी फेटाळून लावला. निवडणुकांच कवित्व अजूनही संपायच नाव घेतले जात नसून त्यामुळे राज्यात सतत संघर्ष अनुभवायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सतत सुरु असल्याचे दिसून येत आहे.

    BJP targets Mammata govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार