विशेष प्रतिनिधी
मुबंई : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीचे औचित्य साधून 18 मिनिटांच्या आपल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र आम्ही शेतकर्यांना हे पटवण्यात अपयशी ठरलो. असे देखील त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
BJP state president Chandrakant Patil is unhappy with the withdrawal of farmers’ law
ते म्हणतात, भारतातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा कायदा मंजूर होता. पण एका विशिष्ट गटाला मात्र हा कायदा अजिबात मंजूर नव्हता आणि त्यांनीच आपला हा हट्ट धरून दिल्ली सीमा रेषेवर मोठे आंदोलन केले. देशामधील अशांतता संपवण्यासाठीच मोदींनी हा निर्णय घेतला आहे. मोदींचे मन खूप मोठे आहे. या कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकरीदेखील समाधान होते.
पुढे ते म्हणतात की, मी स्वतः महाराष्ट्राचा कृषिमंत्री आणि पणनमंत्री होतो. या मधल्या कायद्यांमध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर देखील विकण्याची परवानगी देण्यात येणार होती. तर यामध्ये चुकीचे नेमके काय होते? या देशांमध्ये काही चांगले असले तरी मोदींना विरोध केला जातो. जर एखादा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा असली तरी त्याला विरोध केला जातो. हे चुकीचे आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे की हे कायदे पुन्हा लागू करण्यात यावेत यासाठी मी मोदींकडे विनंती करणार आहे.
BJP state president Chandrakant Patil is unhappy with the withdrawal of farmers’ law
महत्त्वाच्या बातम्या
- शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट ; सेलिब्रेटींनीसुद्धा जेवणासाठी हजेरी लावली
- कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला
- कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार
- Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…