• Download App
    बिहारमध्ये सत्तासंघर्ष शिगेला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न |BJP start controlling CM Nitish Kumar, political eqations changing in Bihar?

    बिहारमध्ये सत्तासंघर्ष शिगेला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दरबार सुरू केल्यानंतर भाजपने त्याला समांतर सहयोग कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नितीश कुमार व भाजपमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.BJP start controlling CM Nitish Kumar, political eqations changing in Bihar?

    मुख्यमंत्री नितीश कुमार जे मुद्दे उपस्थित करतात, त्यावर त्यांची अडवणूक करण्याचे धोरण सध्या भाजप राबवत आहे. त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला तेव्हा, बिहार सरकारने आधी जनसंख्या नियंत्रण कायदा करायला हवा, मगच जातीनिहाय जनगणनेवर विचार करता येईल, असे मत असे भाजपच्या मंत्र्यांनी व्यक्त केले.



    नितीश कुमार यांनी दोन वर्षांच्या खंडानंतर ‘जनता दरबारा’ला पुन्हा सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार सुरू केली त्याच दिवसापासून भाजपच्या मंत्र्यांनीही जनता दरबार भरविण्यास सुरूवात केली. नितीश कुमार त्यांच्या सरकारी निवासस्थानी नागरिकांना भेटतात तर भाजपचे मंत्री पक्षाच्या राज्य मुख्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देतात.

    यापूर्वी सुशील कुमार मोदी हे उपमुख्यमंत्री असताना नितीश कुमार यांच्याबरोबरच जनता दरबारात लोकांना भेटत असे. पण आता चित्र बदलले आहे. सरकारच्या कामाचे श्रेय केवळ नितीश कुमार यांच्याच खात्यात जमा होऊ नये, याकडे भाजपचे लक्ष आहे. भाजपचे मंत्री सक्रिय आहेत आणि कामाचे श्रेय त्यांना मिळायला हवे, अशा पक्षाची सध्याची नीती आहे.

    BJP start controlling CM Nitish Kumar, political eqations changing in Bihar?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य