भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले BJP spokesperson Sambit Patra criticized Chief Minister Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजप सातत्याने निशाणा साधत आहे. ते म्हणतात की, अटकेपूर्वी केजरीवाल म्हणायचे की, मुख्यमंत्र्यांना समन्स कसं बजावलं जाऊ शकतं. पण आज त्यांचा अहंकार चकनाचूर झाला.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘२३ ऑक्टोबरपर्यंत नऊ समन्स जारी करण्यात आले होते, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. समन्स बेकायदेशीर असून हजर होणार नाही, असे तो सांगत होते. ते मुख्यमंत्री असून त्यांना कसे बोलावता येईल, असेही ते म्हणायचे परंतु आज त्याचा अहंकारचा चुराडा झाला आहे.
भाजप प्रवक्ते म्हणाले की, देशाचा कायदा सांगतो की, तुम्ही कायदा मोडला असेल आणि समन्स बजावले असेल, तर तुम्ही त्याचा आदर करून उपस्थित राहावे. मात्र चिंतेची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी एकाही समन्सला प्रतिसाद दिला नव्हता.
BJP spokesperson Sambit Patra criticized Chief Minister Kejriwal
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
- राजकीय पक्षांच्या मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
- सुरुवातीला पवार गटाची चलती, आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांची कुरघोडी; युगेंद्र पवारांना घेराव!!
- EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद