• Download App
    केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार, पण तुरुंगातून तर गुंडांच्या गॅंग चालतात; भाजपचे शरसंधान!! BJP slams Arvind Kejriwal AAP Gangs run from jail not government

    केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार, पण तुरुंगातून तर गुंडांच्या गॅंग चालतात; भाजपचे शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेनंतरही आपल्या पदावर चिकटून राहून तुरुंगातून सरकार चालवणार. पण तुरुंगातून सरकार नव्हे, तर गुंडांच्या गॅंग चालतात, अशा शब्दांमध्ये भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले आहे. BJP slams Arvind Kejriwal AAP Gangs run from jail not government

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आणि मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना 28 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश राऊज कोर्टाने दिले. त्यानुसार केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण त्या कोठडीतूनच त्यांनी आपल्या समर्थकांसाठी एक निवेदन जारी करून आपण तुरुंगातूनच सरकार चालवू, असे सांगितले.

    इतकेच नाही, तर स्वातंत्र्यसैनिकाचा आव आणत दिल्लीच्या जनतेसाठी संदेश देखील प्रस्तुत केला. तो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखविला. त्यात देखील त्यांनी तुरुंगातूनच सरकार चालवण्याचा इरादा व्यक्त करून आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ, असा आशावादही व्यक्त केला. पण केजरीवालांची ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआय केजरीवालांचा ताबा घेणार आहे. त्यामुळे ते तुरुंगातून लवकर बाहेर येण्याची शक्यता नाही, तरी देखील केजरीवालांनी तुरुंगातूनच सरकार चालवण्याचा “निर्धार” व्यक्त केला.

    केजरीवालांच्या या “निर्धारावरच” भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. तुरुंगातून सरकार चालवता येत नाही, तर गुंड माफियांच्या गॅंग चालवल्याच्याच बातमी येतात. मग केजरीवाल त्यांची गॅंग तुरुंगातून चालवणार आहेत का??, असा तिखट सवाल दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी केला. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जरी दिल्लीत गदारोळ केला असला, तरी प्रत्यक्षात दिल्लीच्या जनतेने फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केल्याचे मनोज तिवारी म्हणाले.

    BJP slams Arvind Kejriwal AAP Gangs run from jail not government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??