वृत्तसंस्था
कामारेड्डी : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणात एकाच वेळी भारत राष्ट्र समिती आणि भाजप यांना अंगावर घेतले. भाजपच्या कारचे चारही टायर्स पंचर केल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना डिवचलेच, पण त्या पलीकडे जाऊन भाजपला देखील आधी 2 % मते मिळवून दाखवावीत आणि मग OBC मुख्यमंत्री करण्याच्या बाता माराव्यात, असा टोला हाणला. BJP should get 2 percent votes in Telangana
कामारेड्डी जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रचार सभेत राहुल गांधींनी जोरदार बॅटिंग केली. भाजपच्या कारचे चारही टायर काँग्रेसने पंक्चर केल्याचे सांगून राहुल गांधींनी चंद्रशेखर राव यांना डिवचले. कारण भाजपचे नव्हे, तर भारत राष्ट्र समितीचे निवडणूक चिन्ह कार आहे. राहुल गांधींनी आपल्या टीकेतून भाजप आणि भारत राष्ट्र समिती यांचे साटे लोटे असल्याची टीका केली.
राहुल गांधी म्हणाले :
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढतो हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या विरोधात 24 केसेस आहेत ED ने मला 5 दिवसांत 55 तास प्रश्न विचारले माझी चौकशी आणि तपास केला. माझे हक्काचे घर हिरावून घेतले. पण KCR हे मोदीं विरोधात खरे लढतच नाहीत जर ते खरे लढत असते तर त्यांच्याविरुद्ध केसेस का नाही केल्या?? त्यांचे घर का हिरावून घेतले नाही यांची विधानसभेची सदस्यता रद्द का केली नाही याचा अर्थच KCR खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी विरोधात लढतच नाहीत.
माझे हक्काचे घर हिरावून घेतले तरी हिंदुस्थानात माझी करोडो घरे आहेत लोकांच्या हृदयात माझी घरे आहेत.
तेलंगणा भाजपचे नेते छाती फुगवून फिरत होते नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ सगळे छाती पुढे काढून चालत होते. तेलंगणात OBC मुख्यमंत्री करण्याच्या बाता मारत होते. पण आधी भाजपने येथे 2 % मते मिळवून दाखवावेत आणि मग OBC मुख्यमंत्री करण्याच्या बाता कराव्यात, असा टोला राहुल गांधी यांनी भाजपला हाणला.
प्रत्यक्षात मतदान टक्केवारी
2018 विधानसभा निवडणूक
भाजप : 6.98 % मते (1 आमदार)
2019 लोकसभा निवडणूक
भाजप : 19.65 % मते (4 खासदार)
BJP should get 2 percent votes in Telangana
महत्वाच्या बातम्या
- Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान
- शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!
- केरळच्या कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी; वार्षिक सोहळ्यात गर्दीमुळे गोंधळ
- ओटीटी प्लॅटफॉर्मवर लागू होणार सेन्सॉरशिप; यूट्यूबवरील पत्रकार, ब्लॉगर्स वृत्तवाहिन्याही कक्षेत येणार