श्रीनगर – काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजपचे सरपंच आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. या हल्ल्यामागे लष्करे तय्यबाचा हात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सरपंच गुलाम रसूल दार आणि पत्नी जवाहिरा असे मृतांची नावे आहेत.BJP sarpanch shot dead in J and K
सरपंच दार हे सध्या कुलगाम येथे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत हॉटेलमध्ये राहत होते. त्यांना नुकतीच घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ते हॉटेलमध्ये असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भाजप सरपंचांच्या पीएसओना तत्काळ निलंबित केले आहे.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात लाल चौक भागात कुलगामचे सरपंच आणि त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. रेडवानी कुलगामचे सरंपच गुलाम रसूल दार आणि त्यांची पत्नी जवाहिरा यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. सरपंच गुलाम रसूल दार हे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष देखील होते.
BJP sarpanch shot dead in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला
- मध्य प्रदेश : 5 महिन्यांत लव्ह जिहादची 28 प्रकरणे, 31 आरोपींना तुरुंगवास
- राजस्थानातील शाळांत आता येणार खास आयआयटीचे जलशुद्धीकरण उपकरण, पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचा पुनर्वापरही
- आता विमानतळांवर चेहराच तुमची कागदपत्रे, पुण्यासह सहा ठिकाणी ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण बसविणार
-
स्बळावर सत्तेसाठी भाजपाचे किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी समर्थ बूथ अभियान, पंतप्रधानांना वाढदिवसी करणार समर्पित