नाशिक : लोकसभा आणि विविध राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर भाजपशासित राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसू लागले, त्या उलट निवडणुका संपून देखील काँग्रेसच मात्र अद्याप जुनेच मुद्दे उगाळण्यापासून मागे हटायला तयार नसल्याचे चित्र समोर आले.
लोकसभेची निवडणूक आणि त्या पाठोपाठ हरियाणा महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यांची निवडणूक संपून केंद्रात आणि राज्यांमध्ये आलेली स्थिर सरकारे कामाला लागली. त्यातला पहिला टप्पा म्हणून आपापल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या आणि मुख्यमंत्र्यांचे परदेश दौरे झाले. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाऊन आले. तिथे त्यांनी विक्रमी 16 लाख कोटींचे करार जागतिक पातळीवरच्या कंपन्यांशी केले. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव जपानला पोहोचले. तिथल्या उद्योगपतींना त्यांनी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचा आग्रह धरला. भारतीय दूतावासात त्यांनी भारतीय आणि जपानी आंतरप्रुनर्सशी संवाद साधला. मध्य प्रदेशात 24 आणि 25 फेब्रुवारीला जागतिक गुंतवणूकदार परिषद होत आहे या पार्श्वभूमीवर मोहन यादव यांच्या जपान दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. एरवी मध्य प्रदेश सारखे राज्य परकी गुंतवणुकीसाठी फारसे प्रसिद्ध नव्हते पण आता त्या मोठ्या राज्याला देखील जागतिक गुंतवणुकीच्या नकाशावर आणण्यासाठी तिथल्या भाजप शासनाने प्रयत्न सुरू केल्याचे मोहन यादव यांच्या जपान दौऱ्यातून दिसून आले.
दुसरीकडे ओडिशामध्ये आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मेक इन ओडिशा” प्रदर्शन आणि महाचर्चा सत्राचे उद्घाटन केले. यामध्ये केवळ ओडिशातलेच नव्हे, तर संपूर्ण देशातले मोठे उद्योगपती सामील झाले. देशांतर्गत किंवा परकीय गुंतवणुकीसाठी फारसे प्रसिद्ध नव्हते. केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे पर्यटन या अनुषंगाने ओडिशा कडे बघितले गेले होते, पण त्यापलीकडे जाऊन आता “मेक इन ओडिशा” सारखा उपक्रम राबवून ओडिशाला देखील जागतिक गुंतवणूक नकाशावर आणायचा प्रयत्न तिथल्या भाजप शासनाने चालवला आहे.
Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
मध्य प्रदेश किंवा ओडिशा या राज्यांचे हे सुरुवातीचे प्रयत्न आहेत. त्याचे लाभ दीर्घकालीन टप्प्यामध्ये मिळवण्यासाठी आणखी असे बरेच उपक्रम राबवण्याची गरज आहे, पण निदान भाजपशासित राज्यांनी त्याची सुरुवात तरी सकारात्मक केली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र केंद्रातल्या मोदी सरकारला किंवा विविध राज्यांमधल्या भाजप सरकार यांना ठोकताना जुनेच मुद्दे उगाळायचा सपाटा लावला. राहुल गांधी घटनेचे लाल किताब हातात घेऊन पुन्हा फिरायला लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मध्य प्रदेशातील महू मध्ये राहुल गांधींनी गांधी जय भीम जय संविधान रॅली घेतली, पण त्यामध्ये कुठला नवा विचार देण्यापेक्षा घटनेचे लाल किताब हातात धरून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतलेच जुनेच घिसेपीटे मुद्दे उगाळले. काँग्रेसला राज्यघटना वाचवायचीय, देशात जातीय जनगणना करायची, देश भांडवलदारांच्या ताब्यातून सोडवायचा वगैरे मुद्द्यांवर त्यांनी भाषण केले. हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत आणि वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत आधीच मतदारांनी नाकारलेले होते. त्याचाच फटका काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर बसला होता.
हिंदुत्वाच्या मुद्द्याने देखील हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका दिला, पण तसा फटका बसल्यानंतर सुद्धा न सुधारता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रयागराज मधल्या महा कुंभमेळयावर टीका केली. गंगेत डुबकी मारून गरिबी हटणार आहे का??, असा सवाल अमित शाह यांना केला, पण घटनेचे लाल किताब हातात घेऊन तरी गरिबी हटली होती का??, हा सवाल मात्र त्यांनी केला नाही. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गेंवर सगळीकडून जोरदार टीका झाली. त्यांनी वेळेची नजाकत ओळखून महू मधल्या स्टेजवरूनच हात जोडून माफी मागितली, पण तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदू धर्मियांचा जो अपमान व्हायचा तो होऊन गेला होता.
एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे यांनी कुंभमेळ्यावर टीका करून हिंदूंचा रोष ओढवून घेतला, तर दुसरीकडे राहुल गांधी आजारपणातून बाहेर पडून दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचाराला लागले. त्यांनी वाल्मिकी मंदिरात जाऊन महर्षी वाल्मिकी यांचे दर्शन घेतले आणि संदीप दीक्षित यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मतदारांशी संवाद साधला.
पण एकूण भाजपशासित राज्यांची परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी धडपड दिसली, तर काँग्रेसची जुनेच मुद्दे उगाळत बसण्याची वाईट सवय समोर आली. परकीय गंगाजळीतली विक्रमी घट, विविध वस्तूंची महागाई रोखण्यामध्ये मोदी सरकारला आलेले अपयश या खऱ्या आणि गंभीर विषयांचा स्पर्श देखील काँग्रेसला झाला नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांच्या भाषणातून त्याचा उल्लेखही समोर आला नाही.
BJP ruled states for increasing FDI, but Congress harps on old issues
महत्वाच्या बातम्या
- Devkinandan Thakur वक्फ बोर्ड लागू असेल, तर सनातन हिंदू बोर्ड अधिनियमन आणा; प्रयागराज महाकुंभातील सनातन धर्म संसदेत ठराव मंजूर!!
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी म्हणाला..
- Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
- Pratap Sarnaik : ठाकरेंचा धाराशिवच वाघ शिंदे गट पळविणार? प्रताप सरनाईक यांचे ऑपरेशन टायगरचे संकेत