गृहमंत्री अमित शाह यांनी केलं स्पष्ट! BJP reservation supporter Congress made my fake video viral Home Minister Amit Shah clarified
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बनावट व्हिडिओप्रकरणी काँग्रेसला फैलावर घेतले. काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह गुवाहाटीमध्ये म्हणाले की, काँग्रेस खोटे बोलून दिशाभूल करत आहे. धर्माच्या आधारे आरक्षण हे घटनात्मक नाही. माझा एक बनावट व्हिडिओ बनवून पसरवला जात आहे. पण मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की भाजप एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात, “निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर, आमच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे आम्ही असे म्हणू शकतो की भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 100 पेक्षा जास्त जागा पार केल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही 400 ‘पार’ पर्यंत पोहोचू. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजपला दक्षिण भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले, “काँग्रेस खोटेपणा पसरवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करू इच्छित आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की भाजप एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचा समर्थक आहे आणि नेहमीच त्याचा रक्षक म्हणून काम करेल. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात कोणत्याही राजकीय पक्षाने हात आखडता घेतला असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे, असेही मोदींनी आपल्या जाहीर भाषणात स्पष्ट केले आहे.
BJP reservation supporter Congress made my fake video viral Home Minister Amit Shah clarified
महत्वाच्या बातम्या
- “भटकता आत्मा” हे महाराष्ट्रापुरते का होईना, पण “पप्पू” सारखेच मोठे प्रतिमा भंजन!!
- मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये गोळीबार; 12 जणांनी केली शूटिंग, मोर्टार डागले
- भटकता आत्मा आणि महाराष्ट्रातील अस्थिरता यांचा संबंध जोडून मोदींनी विधानसभा निवडणुकीचाही टोन केला सेट!!
- भटकत्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला आता देश अस्थिर करायला निघालाय; पुण्यातून मोदींचा शरद पवारांवर जबरदस्त प्रहार!!