• Download App
    गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून भाजपने फडकाविला झेंडा, नगराध्यक्षांसह सात अपक्ष नगरसेवक भाजपमध्ये दाखल|BJP overthrows MIM in Godhra municipality

    गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून भाजपने फडकाविला झेंडा, नगराध्यक्षांसह सात अपक्ष नगरसेवक भाजपमध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरातमधील गोध्रा नगरपालिकेतील एमआयएमची सत्ता उलथवून टाकून भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकाविला आहे. एमआयएमसोबत गेलेले नगराध्यक्ष संजय सोनी यांच्यासह सात नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.BJP overthrows MIM in Godhra municipality

    गुजरातमध्ये 2002 साली गोध्रा हत्याकांड झाल्यानं गोध्रा शहर चर्चेत आले होते. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, भाजपाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही एमआयएमने खेळी करून अपक्षांना सोबत घेत नगरपालिका ताब्यात घेतली होती.



    याबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा झालीहोती. गुजरातध्ये गोध्रात सत्ता स्थापन करून एमआयएमने यशस्वी सुरूवात केल्याचे दावे त्यांच्या नेत्यांकडून केले जात होते. मात्र, त्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. नगराध्यक्ष संजय सोनी यांनीच एमआयएमची साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा नगरपालिका ताब्यात घेणे शक्य झाले आहे.

    गुजरातमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये एमआयएमनं चांगलं यश मिळवलं होते. गोध्रा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला 18 , काँग्रेसला 1, एमआयएमला 7 आणि अपक्षांना 18 जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी गोध्रामध्ये प्रचार देखील केला होता. गोध्रा नगरपालिकेतील पक्षीय बलाबल: भाजप: 18, काँग्रेस : 01, एमआयएम: 07, अपक्ष : 18

    BJP overthrows MIM in Godhra municipality

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही