• Download App
    मुख्यमंत्री ममतादिदींविरोधात आता भाजपची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार BJP now lodges a complaint against Chief Minister Mamata Banerjee with the Election Commission

    मुख्यमंत्री ममतादिदींविरोधात आता भाजपची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे असंख्य तक्रारी केल्या होत्या. आता भवानीपूर पोटनिवडणूकीवेळी त्यांच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार झाली आहे.  BJP now lodges a complaint against Chief Minister Mamata Banerjee with the Election Commission

    आपल्याविरुद्धच्या प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख ममता यांनी उमेदवारी अर्जात उल्लेख केला नसल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या उमेदवार प्रियांका टिब्रेवाल यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी साजल घोष यांनी ही तक्रार केली. ममता यांनी जाहीर केलेल्या तपशिलाबाबत त्यांनी आक्षेप नोंदविले.

    आयोगाला पाठविलेल्या पत्रात त्यांनी आसाममधील विविध पोलिस ठाण्यांत ममता यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपशीलही दिला आहे.

    भाजपच्या या पवित्र्यामुळे भवानीनगरची पोटनिवडणूक भाजप साधेपणाने घेण्याच्या आजिबात मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीचा प्रचार जसा शिगेला पोहोचेल तसा भाजप व तृणमुलमधील संघर्ष आणखी वाढेल असे मानले जाते.

    BJP now lodges a complaint against Chief Minister Mamata Banerjee with the Election Commission

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र