विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातल्या लोकसभेची निवडणूक संसदीय पद्धतीच्या लोकशाहीची असली तरी ती अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसारखी व्हावी आणि तिथे जसे राष्ट्राध्यक्षांच्या 2 उमेदवारांमध्ये डिबेट होते, तसे डिबेट भारतात व्हावे आणि आपण त्याचे मॉडरेटर व्हावे या हौसेने सुप्रीम कोर्टाचे 2 न्यायाधीश आणि दक्षिण भारतातल्या एका दैनिकाच्या संपादकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यात डिबेट घडवण्याचा घाट घातला, पण भाजपने मात्र तो वेगळ्या पद्धतीने उधळून लावला.BJP nominates Yuva Morcha vice president to debate against Rahul Gandhi
भाजप युवा मोर्चाने मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना राहुल गांधींच्या विरोधात डिबेट मध्ये उतरवायची तयारी दाखवली.
सुप्रीम कोर्टाचे दोन माजी न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती अजित शाह तसेच हिंदू इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक पत्रकार एन. राम यांनी मोदी विरुद्ध राहुल गांधी असे डिबेट घडवून आणण्याचा घाट घातला होता. या डिबेटचे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारले. पण भाजपने आम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले का?? इंडी आघाडीने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे का??, राहुल गांधी कोणत्या कॅपॅसिटीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिबेट करणार??, अशा सवालांच्या फैरी झाडत त्या डिबेटच्या निमंत्रणाचा डाव उधळून लावला.
त्याचबरोबर राहुल गांधींच्या एकूण क्षमतेविषयी ठळक प्रश्नचिन्ह लावले. राहुल गांधींनी भाजपच्या अन्य कुठल्याही कार्यकर्त्याबरोबर अधिक डिबेट करावे. त्या डिबेटमध्ये पास व्हावे आणि मगच पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर डिबेट मध्ये उतरावे, असे प्रतिआव्हान भाजपच्या बाकीच्या नेत्यांनी दिले. त्या पाठोपाठ भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्य यांनी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना राहुल गांधींविरुद्ध डिबेट मध्ये उतरवण्याची तयारी दाखविली. राहुल गांधींविरुद्ध डिबेट करण्यासाठी अभिनव प्रकाश यांची नेमणूक केली.
– अर्थशास्त्राचे प्राध्यापक अभिनव प्रकाश
अभिनव प्रकाश हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असून ते विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असणाऱ्या रामसज कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. राहुल गांधींनी अभिनव प्रकाश यांच्याबरोबर डिबेट करावे, असे आव्हान तेजस्वी सूर्य यांनी दिले. तसे पत्र त्यांनी न्यायमूर्ती लोकूर, न्यायमूर्ती शाह आणि पत्रकार एन. राम यांना पाठवून दिले आहे. आता अमेरिकन अध्यक्षपदासारखी भारतातली संसदीय निवडणूक लढवू पाहणारे आणि त्याचे मॉडरेटर होऊ पाहणारे हे तीन वरिष्ठ उच्चपदस्थ या डिबेटबाबत काय निर्णय घेतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BJP nominates Yuva Morcha vice president to debate against Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!