वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी पक्षीय पातळीवरून प्रयत्न म्हणून भाजपने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे… अपना बूथ, कोरोना मुक्त हा देशभरातील कार्यकर्त्यांसाठी उपक्रम सुरू केला आहे.BJP national president JP Nadda has asked party workers to start ‘apna booth, corona mukt’ campaign
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज विडिओ कॉन्फरन्सद्वारे भाजपचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना अपना बूथ, कोरोना मुक्त हा उपक्रम आपापल्या बूथ पातळीवर सुरू करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात भाजपचे कोट्यवधी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कारण देशात प्रत्येक बूथमागे १० कार्यकर्त्यांची फौज भाजपने उभी केली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांची प्रचंड गरज निर्माण होते आहे. ती भागविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. १६२ ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स उभारण्यासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. हे सर्व प्लँट्स सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात असतील. यातून 154.19 MT मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादन होईल.
ऑक्सिजन उत्पादन प्लँट्स मंजूर झालेली यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. यातले ३३ प्लँट्स आधीच इन्स्टॉल करण्यात आले असून बाकीचे लवकरात लवकर इन्स्टॉल करण्यात येतील, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन डबल करणार
वाढती मागणी लक्षात घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादन डबल करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. सध्या देशात दिवसाला १.५० लाख व्हायरल्स एवढे उत्पादन होत आहे. येत्या १५ दिवसांत ते डबल करून दिवसाला ३ लाख व्हायरल्स एवढे उत्पादन करण्यात येईल.
सध्या २० प्लँट्समधून रेमडेसिवीरचे उत्पादन होत आहे. आणखी २० प्लँट्समधून उत्पादनाला परवानगी देण्यात आली आहे. आणि ते नियंत्रित किमतीत उपलब्ध करून दिले जाईल, असे मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.