मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा तीव्र विरोध कायम आहे. त्यांनी गोंडामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवित रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आणखी अपमान सहन करणार नसून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले. BJP MPs aggressive for Raj Thackeray’s apology
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा तीव्र विरोध कायम आहे.
त्यांनी गोंडामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवित रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. आणखी अपमान सहन करणार नसून राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले.
गोंडा येथे बृजभूषण सिंह यांनी मोठी रॅली काढली. उत्तर प्रदेशातील नागरिकांनीही राज ठाकरेंचा विरोध करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की मी सर्वप्रथम उत्तर भारतीय आहे. राज ठाकरेंना हिशोब द्यावा लागेल. २००८ पासून त्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला आहे. मजुर तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मारहाण केली. यूपीमध्ये यायचे आहे, तर माफी मागावीच लागेल, असे बृजभूषण सिंह म्हणाले. आपल्याला मराठ्यांचे समर्थन प्राप्त असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो.
BJP MPs aggressive for Raj Thackeray’s apology
महत्वाच्या बातम्या
- NIA Court : काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटे, शब्बीर शाह, हाफिज सईद, सय्यद सलाउद्दीनवर युएपीए आरोपपत्र दाखल!!
- सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट
- NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!