वृत्तसंस्था
कोलकता : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब फेकण्यात आले होते. BJP MP accuses TMC for bomb attack
या प्रकरणाची चौकशी एनआयए सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी आणखी हल्ले केले जात आहेत, असा आरोप अर्जुन यांनी केला. अर्जुन यांनी या हल्ल्याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तृणमूल आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडून अभय मिळत असल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. ते मोकाट फिरतात. पोलिस हे तर तृणमूलचे दादा बनले आहेत. मला अशा हल्ल्यांची कधीही भीती वाटत नाही आणि मी घाबरणार नाही.
तृणमूलचे नेते पार्थ भौमिक यांनी हा आरोप फेटाळून लावला. अर्जुन आणि त्यांच्या लोकांनीच हा कट आखल्याचा दावा त्यांनी केला. बॉम्ब फेकण्यात आले नाहीत, तर ते जेथे ठेवले होते तेथे फुटले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
BJP MP accuses TMC for bomb attack
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी हल्याचा कट दिल्ली पोलीसांनी उधळून लावला, सहा जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात, दिल्लीत हल्याची योजना
- पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदारांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, तृणमूलच्या गुंडांनी घडविल्याचा आरोप
- LJP खासदार राजकुमार राजाविरुद्ध बलात्कार प्रकरण; चिराग पासवान यांच देखील नाव
- काळा कोट परिधान केला म्हणजे आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मौल्यवान नाही, वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख भरपाईची याचिका फेटाळली