वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची रणनीती यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. गोव्यात भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी केले होते. BJP moves towards majority in Goa; Devendra Fadnavis’s strategy is successful
गोव्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यानंतर आता भाजपाने बढत घेतली असून गोव्यात भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपाला २१ जागा, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीही ५ जागांवर आघाडीवर आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. गोव्यात काँग्रेस-भाजपा यांच्यात प्रमुख लढत आहे. सुरुवातीच्या निकालात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून आलं. गोव्यात सर्वात जुनी पार्टी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीवर सर्व राजकीय पक्षाचं लक्ष होतं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जर भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही मतांची गरज पडली तर आम्ही मगोप सोबत आघाडी करू असं सांगितले होते.
देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी रणनीती आखली. तीच भाजपाच्या यशातून दिसून येत असल्याचं निकालातून दिसत आहे. गोव्यात मागील वेळी बहुमतापासून दूर राहिलेली भाजपानं यंदा बहुमत गाठल्याचं दिसून येत आहे. तर या निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, गोव्यात भाजपाचं सरकार येणार आहे. त्यात कुठलंही दुमत नाही. संख्या कमी-अधिक होईल. पण गोव्यात भाजपाचं सरकार होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
BJP moves towards majority in Goa; Devendra Fadnavis’s strategy is successful
महत्त्वाच्या बातम्या
- One Nation One Election : मुख्य निवडणूक आयुक्तांचं ‘एक देश एक निवडणूक’बाबत महत्वाचं विधान! अखिलेश यादव यांच्या आरोपावर उत्तर …
- रशियाकडून शत्रू असलेल्या राष्ट्रांची यादी जाहीर; आर्थिक निर्बंधाला राष्ट्रपती पुतीन यांचे चोख उत्तर
- Goa Election Results 2022 : गोव्यात उत्पल पर्रीकरांचे बंड भाजपला भोवले; 20 आकडा गाठणे काँग्रेसलाही कठीण!!; सत्तास्पर्धा घासून!!
- गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर