• Download App
    उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे सहा आमदारांचा मृत्यु, वाढत्या संसर्गामुळे राजकीय नेते अस्वस्थ।BJP MLA died due to corona in UP

    उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे सहा आमदारांचा मृत्यु, वाढत्या संसर्गामुळे राजकीय नेते अस्वस्थ

    वृत्तसंस्था

    लखनौ : रायबरेलीच्या सलोन विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी (वय ६४) यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत सहा आमदारांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मंत्र्यांचा समावेश आहे. BJP MLA died due to corona in UP

    लोकांची कामे करण्यासाठी राजकीय नेत्यांना सतत जनतेच्या संपर्कात रहावे लागते. मात्र त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
    दल बहादूर कोरी हे पहिल्यांदा १९९३ मध्ये आमदार झाले होते.



    त्यानंतर १९९६ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. राजनाथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते मंत्री बनले. अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांना विजय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या कारणामुळेच स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय लोकांत दल बहादूर यांचा समावेश होता.

    यापूर्वी बरेलीचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा मृत्यू झाला. ओरिया सदरचे भाजपचे आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिमम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्यावर्षी पहिल्या लाटेत उत्तर प्रदेश कॅबिनेटमधील कमल राणी वरुण आणि आमदार चेतन चौहान यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

    गोंडा जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनोद कुमार सिंह यांचाही कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर लखनौत उपचार सुरू होते.

    BJP MLA died due to corona in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य