• Download App
    जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅनbjp master plan for election obc vote bank

    जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीने जातनिहाय जनगणनेची देशपातळीवर मागणी केली आणि त्याचवेळी महाराष्ट्रासारख्या राज्यांमधून मराठा आरक्षणासारखे राजकीय आक्रमण भाजपवर केले. bjp master plan for election obc vote bank

    या पार्श्वभूमीवर भाजपने आपले सर्व समावेशक हिंदुत्ववादी राजकारण मजबूत करण्यासाठी ओबीसी देशभरातली ओबीसी व्होट बँक अधिकाधिक मजबूत करण्याचा मास्टर प्लॅन आखला आहे.

    भाजप राष्ट्रीय पक्ष आहे त्याला एकजातीय किंवा एकधर्मीय राजकारण करून चालणार नाही. त्यातून देशव्यापी राजकीय अपील तयार करता येणार नाही, याची पक्की जाणीव भाजपच्या रणनीतीकारांना आहे. त्यामुळे भाजपला सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाचा तोंडावळा कायम ठेवताना देशभरातल्या सर्व छोट्या – मोठ्या जातींची मोट बांधून देशव्यापी व्होट बँक बांधावी लागेल. ती आधीच ओबीसी व्होट बँकेच्या रूपाने भाजपकडे तयार आहे. ती अधिक सुदृढ करावी लागेल. या दृष्टीने भाजपच्या रणनीतीकारांनी मास्टर प्लॅन आखला आहे.

    वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रस्थापित जातसमूहांसह इतर सर्व छोट्या मोठ्या जात समूहांना राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक – आर्थिक आधारांवर एकत्र करणे, त्यांच्या छोट्या – मोठ्या मागण्यांकडे राज्यांमधल्या महत्त्वाच्या नेत्यांनी लक्ष पुरवणे, त्याचा फॉलोअप घेणे, त्याचबरोबर त्या मतदारांची संख्या सुनिश्चित करून त्यावर राजकीय दृष्ट्या कॉन्सन्ट्रेट करणे आणि छोट्या – मोठ्या जात समूहांचे एकत्रीकरण करून त्यांचे राजकीय सामाजिक हितसंबंध जपणे, या समूहांना ठळक राजकीय ओळख मिळवून देणे हा तो मास्टर प्लॅन आहे. यातून भाजपची एकजातीय अथवा एकधर्मीय अशी ओळख तयार होणार नाही, तर त्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख दृढमूल करण्याकडे भाजप रणनीतीकारांचा कल आहे.



    2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ओबीसी मतदार भाजपशी जोडण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत.

    लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी व ओबीसी मते वाढवण्यासाठी देशभरातील ओबीसी मतांना लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजातील असल्याने ते ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी देशातील पहिले ओबीसी पंतप्रधान आहेत, असा प्रसार आणि प्रचार केला जात आहे.

    नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील ओबीसी नेत्यांची बैठक भाजपच्या मुख्यालयात बोलावली होती. या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री किशोर प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती, एस. पी. सिंह बघेल, खासदार रमेश विदोडी, बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी, तेलंगणाचे खासदार लक्ष्मण यांच्यासह देशभरातील भाजपचे ओबीसी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    रणनीतीकडे असणार लक्ष

    या वेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व लक्ष ओबीसी मतदारांवर केंद्रित केले असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय सर्वाधिक ओबीसी मतदार भाजपला जोडण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्याचे आदेश या नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप अंमधात आणणाऱ्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

    bjp master plan for election obc vote bank

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!