विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निहवडणुकीमध्ये मतमोजणी अंतिम टप्प्याकडे सरकत असताना भाजपला 241, काँग्रेसला 96, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 36, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 31, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9, नितीश कुमार यांच्या जयदयूला 15, तसेच चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमला 15 जागा मिळण्याची चिन्हे आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, भाजप स्वबळावरचे बहुमत गमावतो आहे.BJP losing majority on it’s own ringing bells for Modi in power
मतमोजणीच्या मधल्या टप्प्यावरच्या कलानुसार भाजप सह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 296 जागा मिळाल्या आहेत, हे खरे, परंतु त्यापैकी भाजपला 241 जागा मिळाल्याने देशांमध्ये भाजपच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मोदींच्या नेतृत्वाखालच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा वाजल्याचे मानण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आलेले आणि सध्या टिकून असलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे नेमकी काय भूमिका घेतील??, याविषयी राजधानी मध्ये दाट शंका निर्माण झाली आहे.
चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळाले आहे. त्यांना 125 जागांवर मोठी आघाडी मिळाली आहे त्यामुळे त्यांना तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची गरज नाही. भाजपला त्यांच्याबरोबरच्या आघाडीत राहून विधानसभेत 7 जागांवर आघाडी मिळाली आहे. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 20 जागांवर आघाडी मिळाली आहे पण विधानसभा निवडणुकीचा विषय वेगळा आणि लोकसभा निवडणुकीचा विषय वेगळा एकीकडे भाजपने स्वबळावर असलेले 303 चे बहुमत गमावून भाजपा आता 241 च्या आसपास खेळतो आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सध्या असलेले किंवा नव्याने आलेले पक्ष त्यांच्याबरोबर टिकून राहतील का??, याविषयी दाट शंका निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रात 2019 मध्ये महायुतीला जनतेने कौल देऊन बहुमत दिले होते. परंतु, त्यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन गेम फिरवत भाजपला विरोधी बाकांवर बसवले होते. तसाच खेळ काँग्रेस आणि बाकीचे मित्र पक्ष भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी फोडून करतात की मोदी कार्ड ऍक्टिव्हेट होऊन काँग्रेसबरोबरच आघाडी फोडून मोदी आपली आघाडी मजबूत करतात??, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले होते. 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये 303 अशा भाजपने कमळ चिन्हावर बहुमताच्या जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये मात्र पंतप्रधान मोदींनी 400 पारचा नारा दिला. प्रत्यक्षात भाजपला 241 च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागत आहे, जे बहुमतापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळेच भाजपच्या सत्तेच्या मार्गात धोक्याची घंटा वाजत आहे.
भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी फोडण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी आधीच संपर्क साधण्याची बातमी दिल्लीच्या वर्तुळात फिरत आहे.
BJP losing majority on it’s own ringing bells for Modi in power
महत्वाच्या बातम्या
- निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
- मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; 10व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन, सुसाईड नोटही सापडली
- नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??
- फडणवीसांच्या निकटवर्ती नेत्याचा ठाकरेंशी संपर्क की माध्यमेच फेक न्यूज देऊन टीआरपी वाढविण्यात दंग??