• Download App
    भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविले असते, तर तीरथ सिंहांचा वाचवू शकले असले, उत्तराखंडची बंगालशी तुलनाही गैर; घटनातज्ञ सुभाष कश्यपांचे मत|BJP leadership intentionally did not save tirath singh rawat, mamata can easily win byelections, says subhash kashyap

    भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविले असते, तर तीरथ सिंहांना वाचवू शकले असते! उत्तराखंडची बंगालशी तुलनाही गैर; घटनातज्ञ सुभाष कश्यपांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये घटनात्मक पेचप्रसंग दाखवून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना पायऊतार व्हावे लागले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी ठरविले असते, तर ते तीरथ सिंह रावत यांना वाचवू शकले असते, असे परखड मत घटनातज्ञ आणि लोकसभेचे माजी सचिव डॉ.सुभाष कश्यप यांनी व्यक्त केले आहे. अर्थात उत्तराखंडमधील घटनात्मक पेचप्रसंगाची तुलना बंगालशी होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.BJP leadership intentionally did not save tirath singh rawat, mamata can easily win byelections, says subhash kashyap

    तीरथ सिंह रावत यांना १० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुख्यमंत्रीपदी राहता आले असते. कारण तेवढ्या मुदतीत त्यांना विधानसभेवर निवडणूक येणे अपेक्षित होते. पण राज्याची विधानसभेची मुदत वर्षभराच्या आत संपत असेल, तर राज्यात कोणत्याही मतदारसंघात पोटनिवडणूक होत नाही. हा नियम तीरथ सिंहांना दाखविण्यात आला.



    पण त्याचवेळी संपूर्ण राज्याची निवडणूक ६ महिने आधी घेणे शक्य होते. पण भाजप पक्षश्रेष्ठींनी तो पर्याय स्वीकारला नाही, याकडे सुभाष कश्यप यांनी लक्ष वेधले आहे. तीरथ सिंहांना राजकीय कारणांसाठी घालवून नव्या नेतृत्वाखालीच भाजप उत्तरखंडच्या निवडणूकीला सामोरा जाऊ इच्छितो हे यातून दिसत असल्याचे कश्यप यांचे मत आहे. दै. भास्करने ही बातमी दिली आहे.

    पश्चिम बंगालमध्ये तशी स्थिती नाही. एकतर भवानीपूरच्या आमदाराने राजीनामा देऊन ममतांसाठी सीट खाली केली आहे. तेथे पोटनिवडणूक कोरोनाच्या नावाखाली टाळणे निवडणूक आयोगाला शक्य नाही. कारण पश्चिम बंगाल विधानसभेची अख्खी निवडणूक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आरामात भवानीपूरमधून निवडून येऊ शकतात, असे सुभाष कश्यप यांनी स्पष्ट केले आहे.

    ममता बंगालमध्ये विधान परिषद अस्तित्वात आणू इच्छितात. अर्थात त्याच्याशी ममतांच्या निवडणूकीचा संदर्भ लावणे राजकीय अपरिपक्वता आहे. कारण एकतर विधान परिषद अस्तित्वात आणायला केंद्राचीही संमती लागते हे ममतांना माहिती आहे. सध्याचे केंद्र – ममता संबंध पाहाता त्या एवढे अपरिपक्व राजकारण आपल्या साध्या विधिमंडळात निवडून येण्यासाठी खेळतील, असे वाटत नसल्याचे कश्यप यांचे मत आहे.

    कारण विधानसभेत निवडून येणे तुलनेने सोपे आहे आणि विधान परिषद अस्तित्वात आणण्याची प्रक्रिया त्याच्या पेक्षा नक्कीच तांत्रिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या देखील किचकट आहे, हे ममतांना माहिती आहे, अशी टिपण्णी सुभाष कश्यप यांनी केली आहे.

    BJP leadership intentionally did not save tirath singh rawat, mamata can easily win byelections, says subhash kashyap

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य