• Download App
    भाजपचे नेते संसदेच्या पायऱ्यांवर मुलायमसिंगांना भेटले; साधा योगायोग की आणखी काही?? । BJP leaders meet Mulayam Singh on the steps of Parliament; Simple coincidence or something else ??

    भाजपचे नेते संसदेच्या पायऱ्यांवर मुलायमसिंगांना भेटले; साधा योगायोग की आणखी काही??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये आर्थिक आढावा आज मांडण्यात आला आहे. पण या पेक्षा एक वेगळीच चर्चा संसदेच्या कॉरिडॉरमध्ये सुरू झाली आहे. BJP leaders meet Mulayam Singh on the steps of Parliament; Simple coincidence or something else ??

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नक्वी हे अचानक समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांना संसदेच्या पायऱ्यांवर भेटले. दोन्ही नेत्यांनी मुलायमसिंग त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना प्रणाम केला. मुलायमसिंग यादव यांनी देखील त्यांना तोंड भरून सदिच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. याच घटनेची चर्चा संसदेच्या कॉरिडॉरमध्ये सुरू झाली आहे.



    भाजपचे दोन वरिष्ठ नेते मुलायमसिंह यांना संस्थेच्या पायऱ्यांवर भेटणे आणि त्यांनी आशीर्वाद देणे हा साधा योगायोग आहे? की घडवून आणलेला राजकीय योगायोग आहे? याची ही चर्चा आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आल्या आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात “टफ फाईट” असल्याचे चित्र रंगवण्यात येत आहे. पण त्याच वेळी अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव या पिता-पुत्रांनी मध्ये राजकीय मतभेदाची दरी रुंदावल्याची चिन्हे आहेत. त्यातूनच मुलायमसिंह यांची दुसरी सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

    या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव उत्तर प्रदेशात भाजपच्या विरोधात धुवांधार प्रचार करत असताना संसदेच्या पायऱ्यांवर मुलायमसिंग यादव यांना अचानक भाजपचे दोन वरिष्ठ केंद्रीय मंत्री भेटणे आणि मुलायमसिंग यादव यांनी त्यांना सदिच्छा देणे याकडे केवळ साध्या योगायोगापेक्षा वेगळा राजकीय योगायोग या दृष्टिकोनातून राजकीय निरीक्षक बघत आहेत.

    BJP leaders meet Mulayam Singh on the steps of Parliament; Simple coincidence or something else ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक