विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात फक्त 21 दिवसांच्या अंतरिम जामीनावर बाहेर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पंतप्रधान पदाची पुडी सोडली. पण ते निमित्त बरोबर साधून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा खुंटा हलवून बळकट करण्याची संधी घेतली!! BJP leaders confirms solidarity with PM Modi’s leadership after kejriwal’s claim of amit Shah as PM
वास्तविक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 ची निवडणूक होणार आणि ती भाजप जिंकणार याविषयी भाजपच्या कुठल्याच नेत्याच्या अथवा कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम नव्हता आणि नाही. भाजपने जाहीरपणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून तेच पंतप्रधान होतील, असे स्पष्ट केले आहे.
परंतु निवडणुकीचे मतदानाचे 3 टप्पे ओलांडल्यानंतर आणि चौथ्या टप्प्याच्या तोंडावर अरविंद केजरीवालांनी नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी रिटायर्ड होतील. कारण ते 75 वर्षांचे होणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या लाडक्या अमित शाह यांना पंतप्रधान करतील, अशी राजकीय पुडी सोडून दिली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील तेच पुढची 5 वर्षे पंतप्रधान राहतील हे सांगण्याची संधी मिळाली. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर वेगवेगळ्या प्रकारे शिक्कामोर्तब केले.
अमित शाह आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब केले, तर नड्डा आणि राजनाथ सिंह यांनी ट्विट करून इंडी आघाडीवर निशाणा साधला ज्यांच्याकडे ना नेता आहे, ना नीती आहे, ते भाजपच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करतात. पण मूळात भाजपच्या घटनेत 75 व्या वर्षी निवृत्त करण्याचे कुठलेच प्रावधान नाही, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंग यांनी तशाच आशयाचे ट्विट करून इंडी आघाडीवर शरसंधान साधले. इंडी आघाडीला स्वतःचे नेतृत्व नाही. त्यामुळे संभ्रम फैलावणे एवढेच त्यांचे काम उरले आहे, पण भाजपच्या कुठल्याही नेत्याच्या अथवा कार्यकर्त्याच्या मनात कुठलाही संभ्रम नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुढचे सरकार अस्तित्वात येईल. भारताचा विकास वेगाने होईल त्याचे अग्रदूत नरेंद्र मोदीच असतील, असे राजनाथ सिंग यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले.
भाजपमध्ये किंबहुना संपूर्ण देशात आणि जगातही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल कुठलीही शंका नसताना केजरीवालांनी अमित शाह यांच्या नेतृत्वाची पुडी सोडली. त्याला वेगवेगळे राजकीय शेपट्या लावल्या, पण प्रत्यक्षात भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाचा खुंटा हलवून बळकट करण्याची संधी घेतली.
BJP leaders confirms solidarity with PM Modi’s leadership after kejriwal’s claim of amit Shah as PM
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी ‘रामद्रोही’ राजकारण करतात’ ; मुख्यमंत्री योगींचा ‘सपा’वर निशाणा!
- ‘ओडिशातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगा’ ; मोदींचे नवीन पटनायक यांना आव्हान!
- ‘दारूचा प्रभाव आहे की तिहार…’ ; भाजपने लगावला केजरीवालांना टोला!
- पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार