• Download App
    Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!

    Rekha Gupta भाजपने रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्लीला दिला चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रेखा गुप्तांच्या रूपाने दिल्ली राज्याला भाजपने चौथ्या महिला मुख्यमंत्र्याचा लाभ दिला. शालीमार बाग मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांची भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्या उद्या रामलीला मैदानावर दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

    दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार??, याचा सस्पेन्स भाजपने आज शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी संपविला. रेखा गुप्ता यांच्या रूपाने दिल्ली राज्याला चौथ्या महिला मुख्यमंत्री पदाची भेट दिली. रेखा गुप्ता यांच्या आधी सुषमा स्वराज या भाजपकडून दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर शीला दीक्षित काँग्रेसकडून तब्बल तीन टर्म म्हणजे १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. अतिशी मार्लेना आम आदमी पार्टीच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यानंतर आता रेखा गुप्ता भाजपकडून दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.

    रेखा गुप्ता शालिमार बाग या मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या. त्या दिल्ली प्रदेश भाजपच्या सरचिटणीस होत्या. पूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये 48 जागांचे भक्कम बहुमत मिळाल्यानंतर भाजपला पुढच्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदावरचा चेहरा हवा होता तो रेखा गुप्ता यांच्या रूपाने पक्षाने निवडला.

    BJP leaders celebrate the election of MLA Rekha Gupta as the new Chief Minister of Delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये