• Download App
    पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या; रस्त्याच्या कडेला गाडीत रक्ताने माखलेला मृतदेह सापडला BJP leader shot dead in West Bengal

    पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या; रस्त्याच्या कडेला गाडीत रक्ताने माखलेला मृतदेह सापडला

    भाजपा कार्यकर्त्यांनी मृतदेह दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर ठेवून केले आंदोलन.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता :  पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपा नेत्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला SUV मध्ये सापडला. या घटनेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी मृतदेह दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर ठेवून आंदोलन केले. BJP leader shot dead in West Bengal

    राजेंद्र साव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजेंद्र साव हे आसनसोल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३३ चे निमंत्रक होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र यांचा मृतदेह त्याच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूसाचा तुकडाही जप्त करण्यात आला आहे.

    भाजपा कार्यकर्त्यांनी ४८ तासांचा दिला अल्टिमेटम –

    या घटनेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेटमही दिला असून, राजेंद्र साव यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक न झाल्यास कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

    दुसरीकडे, राजेंद्र साव यांचा भाऊ जितेंद्र साव यांनी आरोप केला आहे की, दुपारी दोनच्या सुमारास ते आसनसोल येथून राणीगंज येथून गाडीतून निघाले होते. आसनसोलमध्ये पाच लाख रुपये कुणाला तर द्यायचे आहेत, असे त्यांनी घरी सांगितले होते, मात्र ही रक्कम कोणाला द्यायची हे मात्र सांगितले नव्हते.

    BJP leader shot dead in West Bengal

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार