‘’दोन कारणांसाठी स्वार्थी राजकीय घटकांचा हा मेळावा आहे’’ असंही भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दरवेळेप्रमाणे यावेळीही विरोधकांनी एकजुटीची कसरत सुरू केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत असून, तेथे भाजपाविरोधातील महाआघाडीचा अजेंडा ठरवला जाऊ शकतो. आता या बैठकीबाबत भाजपाने नितीशकुमार यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी विचारले की, ‘’बारात तो सज रही है, लेकिन दूल्हा कौन है?’’ BJP leader Ravi Shankar Prasad criticized the meeting of opposition parties in Patna
पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवर भाजपा सातत्याने हल्लाबोल करत आहे, तर मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी सर्व पक्ष पूर्णपणे तयार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी खिल्ली उडवली की, “आम्ही ऐकले आहे की नितीश बाबू 2024 मध्ये पाटण्यात मिरवणूक काढण्याच्या तयारीत आहेत, पण पाटण्याच्या या मिरवणुकीचा वर कोण आहे? हीच समस्या आहे, सर्व पंतप्रधान पदासाठी दावेदार आहेत.” नितीशबाबू, अरविंद केजरीवाल एकत्र आपला अजेंडा चालवत आहेत. यामध्ये राहुल गांधी, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचा समावेश आहे.
रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, ‘’दोन कारणांसाठी स्वार्थी राजकीय घटकांचा हा मेळावा आहे, एक म्हणजे नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे आपली खुर्ची पुढे नेण्यासाठी. भारत त्यापलीकडे गेला आहे, आता भारताला स्थिर सरकार हवे आहे. पूर्ण बहुमताचे सरकार आल्यावर भारताचा आदर किती वाढतो, हे मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दिसून आले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक मोठी आर्थिक शक्ती, एक मोठी सामरिक शक्ती आणि एक मोठी बाजारपेठ बनत आहे.’’
BJP leader Ravi Shankar Prasad criticized the meeting of opposition parties in Patna
महत्वाच्या बातम्या
- साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा
- अभिमानास्पद : जोरदार वारा, मुसळधार पावसात वॉशिंग्टन विमानतळावर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ मोदी भिजत उभे राहिले
- PM मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते का??; वाचा नेहमी “मोदी विरोधी” भूमिका मांडणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सचे विश्लेषण
- हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर झाले PM मोदींचे चाहते, म्हणाले- पंतप्रधान भारतीय संस्कृतीचे प्रतीक