• Download App
    भाजप नेते प्रमोद यादव यांची उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्याBJP leader Pramod Yadav shot dead in Jaunpur

    भाजप नेते प्रमोद यादव यांची उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

    कधीकाळी धनंजय सिंह यांच्या पत्नीविरोधात निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा BJP leader Pramod Yadav shot dead in Jaunpur

    विशेष प्रतिनिधी

    जौनपूर : उत्तर प्रदेशमध्ये जौनपूर भाजपचे जिल्हा मंत्री प्रमोद यादव, बोधापूर गावचे रहिवासी, यांची गुरुवारी सकाळी मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळी त्याच्या छातीत लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला.

    लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने थांबलेल्या दुचाकीस्वारांनी प्रमोद यादव यांची गुरुवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

    सकाळी दहाच्या सुमारास प्रमोद यादव हे त्यांच्या चारचाकी गाडीने घरून निघाले. ते रायबरेली-जौनपूर रस्त्यावर गावाच्या वळणाजवळ पोहोचले तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्याच्या छातीत लागली. जखमी अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.

    घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. अजयपाल शर्मा यांनी जिल्हा रुग्णालय व घटनास्थळी पोहोचून तपास केला. काही संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.

    BJP leader Pramod Yadav shot dead in Jaunpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!