छत्तीसगडमधील छोटेडोंगर येथे नक्षलवाद्यांनी भाजप नेते सागर शाहू यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नारायणपूरचे एसपी पुष्कर शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
छत्तीसगडमधील छोटेडोंगर येथे नक्षलवाद्यांनी भाजप नेते सागर शाहू यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नारायणपूरचे एसपी पुष्कर शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. BJP leader killed by Naxalites in Chhattisgarh, second BJP leader targeted in 5 days
हत्येपूर्वी दिली होती धमकी
दुचाकीवरून आलेले दोन नक्षलवादी भाजप नेत्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी जवळून डोक्यात गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सागर शाहू हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते. ही घटना घडण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांना लोहखनिज प्रकल्पाच्या उभारणीला पाठिंबा सोडण्याबद्दल धमकावले होते.
5 फेब्रुवारीला नीलकंठ कक्केम यांची हत्या
याआधी रविवारी (5 फेब्रुवारी) भाजप नेते नीलकंठ कक्केम यांची चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. कक्केम हे 15 वर्षांपासून उसूरच्या मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. मेहुणीच्या लग्नाच्या तयारीसाठी ते मूळ गावी गेले होते. कक्केम कुटुंबासमोर नक्षलवाद्यांनी हा निर्घृण खून केला होता. नीलकंठ कक्केम 30 वर्षांपासून राजकारणात सक्रिय होते. विजापूर परिसरात त्यांचा मोठा प्रभाव होता.
नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाची मोहीम
छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ आणि पोलीस हे नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम राबवत आहेत. येथे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस स्थापन झाल्यापासून नक्षलवादी कारवायांमध्ये घट झाली आहे. नक्षलवाद्यांच्या संदर्भात सुरक्षा दले त्या भागात मोठ्या दक्षतेने काम करत आहेत. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटके जप्त करण्याच्या उद्देशाने शोध विनाश ऑपरेशन्सव्यतिरिक्त येथे अनेकदा एरिया डॉमिनेशन मोहिमा राबवल्या जातात.
2 फेब्रुवारीला 7 नक्षलवाद्यांना अटक
अशीच एक संयुक्त मोहीम 141 बटालियन CRPF आणि छत्तीसगड पोलिसांनी सुकमा येथील कोंडवाई गावाभोवती 1 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा सुरू केली. रात्रभर जवानांनी या भागात काळजीपूर्वक कोम्बिंग केले. यानंतर 2 फेब्रुवारीला 7 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेले सर्व 7 नक्षलवादी निमलगुडेमच्या रिव्होल्युशनरी पीपल्स कौन्सिल (RPC) आणि प्रतिबंधित CPI माओवादी पक्षाचे सदस्य आहेत. सुरक्षा दलांनी अटक केलेल्यांमध्ये कलमू सत्यम, कलमू जोगा, किकिडी जोगा, मादिवी मंगा तसेच कलमू भीमा हे मागील 3 वर्षांपासून आरपीसी सदस्य आहेत.
BJP leader killed by Naxalites in Chhattisgarh, second BJP leader targeted in 5 days
महत्वाच्या बातम्या